ETV Bharat / bharat

HEC Staff Salary Issue : चंद्रयान-III चं प्रक्षेपण पॅड तयार करणारे कर्मचाऱ्यांना 20 महिन्यांपासून पगार नाही, जाणून घ्या सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 10:06 PM IST

HEC Staff Salary Issue : एचईसीच्या कर्मचाऱ्यांना 20 महिन्यापासून पगार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्मचारी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत आहेत, असं सीपीआय खासदार बायोनी विस्वम यांनी सांगितलं. “त्यांपैकी अनेकांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटो-रिक्षा चालक, रस्त्यावरील विक्रेते, रोजंदारीवर मजूर म्हणून अर्धवेळ नोकरी करण्यास भाग पाडलं असल्याचं देखील ते म्हणाले.

HEC Staff Salary Issue
HEC Staff Salary Issue

नवी दिल्ली HEC Staff Salary Issue : चंद्रयान III चे प्रक्षेपण पॅड तयार करणाऱ्या हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनच्या (एचईसी) 3 हजार कर्मचाऱ्यांना गेल्या 20 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळं सीपीआय खासदार बायोनी विश्वम यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करत हस्तक्षेप करण्याची मागणी केलीय.

20 महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविना : खासदार बायोनी विश्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिललेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मी हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (HEC) च्या 3 हजाराहून अधिक कर्मचार्‍यांच्या दुर्दशेबद्दल माझी चिंता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानाना पत्र लिहत आहे. ज्यांना गेल्या 20 महिन्यांपासून त्यांचं वेतन मिळालेलं नाही. HEC ही भारतातील सर्वात जुनी आणि सक्षम सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीपैकी एक आहे. या कंपनीनं भारताच्या अंतराळ कार्यक्रमात देशासाठी अनेक वर्षांच्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्यात बहुचर्चित चांद्रयान-III साठी प्रक्षेपण पॅड तयार करणे समाविष्ट आहे, असं ”विश्वम यांनी पत्रात म्हटलं आहे.

कामगारांचं देशासाठी अमूल्य योगदान : हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनमध्ये (एचईसी) पूर्णवेळ अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक नाही. त्यामुळं पगार देण्यास विलंब होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. “तथापि, ज्या कामगारांनी देशासाठी अमूल्य योगदान दिलं आहे, त्यांचा कोणताही दोष नसताना त्रास सहन करावा लागतोय. या कर्मचाऱ्यांनी भारताचा अवकाश कार्यक्रम आणि इतर महत्त्वाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यांना आता गरीबीत जगण्यास भाग पाडलं जात आहे, ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचं,” विश्वम म्हणाले.

आर्थिक पॅकेज देण्याची मागणी : यांनी पुढे म्हटलं आहे की, या कठीण काळात त्यांना मदत करण्यासाठी सरकारनं आर्थिक पॅकेज देखील प्रदान केलं पाहिजं. एचईसीचं पुनरुज्जीवन सुनिश्चित करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. "हे कर्मचारी भारताच्या औद्योगिक क्षेत्राचा कणा आहेत, हे देशानं लक्षात ठेवायला हवं. देशाच्या विकासात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे,". HEC कंपनी अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. HEC कॉर्पोरेशनला भारतीय अंतराळ संशोधन संस्था, संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, कोल इंडियासह इतर पोलाद क्षेत्रातील कंपन्यांकडून ऑर्डर मिळतात.

हेही वाचा -

  1. Chandrayaan ३ : चंद्रावर आज उजाडणार दिवस; इस्रो पुन्हा लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानला करणार सक्रिय
  2. Chandrayaan 1 data : पृथ्वीच्या मदतीने चंद्रावर तयार होत आहे पाणी, चंद्रयान 1 डेटातून मोठा खुलासा
  3. Chandrayaan 3 landing : नासाच्या उपग्रहाने घेतले चंद्रयान-३ च्या लँडिंग साइटचे फोटो....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.