ETV Bharat / bharat

चारा घोटाळा प्रकरणात लालूंना जामीन? झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी - लालू प्रसाद यादव जामीन

उच्च न्यायालायने न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांच्यापुढे या प्रकरणी सुनावणी होणार आहे. जेवढी शिक्षा त्यांना झाली आहे, त्यापैकी अर्धी शिक्षा म्हणजेच ४२ महिन्यांची शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे जामीन मिळावा, असे त्यांच्या वकीलांनी न्यायालयाला आधीच सांगितले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 12, 2021, 12:16 PM IST

रांची - बहुचर्चित चाराघोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना जामीन मिळणार का? हे आज स्पष्ट होणार आहे. झारखंड उच्च न्यायालयात आज (शुक्रवार) सुनावणी होणार आहे. दुमका येथील खजिन्यातून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आज होणाऱ्या सुनावणीकडे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचे लक्ष लागले आहे.

उच्च न्यायालायने न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांच्यापुढे या प्रकरणी सुनावणी होणार आहे. जेवढी शिक्षा त्यांना झाली आहे, त्यापैकी अर्धी शिक्षा म्हणजेच ४२ महिन्यांची शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे जामीन मिळावा, असे त्यांच्या वकीलांनी तुरुंगात सांगितले आहे.

निकाल देण्यासाठी न्यायालयाने अवधी राखून ठेवला होता -

जामीनासाठी लालू यांनी आधीच अर्ज केला होता. लालू प्रसाद यादव यांचे वकील कपिल सिब्बल आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिवक्ता राजीव सिन्हा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तीवाद न्यायालयात मांडले होते. सीबीआयचे वकील राजीव सिन्हा यांनी जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर न्यायालयाने निकाल देण्यासाठी वेळ मागून घेतला होता. त्यानुसार आता १२ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

मागील काही दिवसांपासून राजद प्रमुख लालूंची प्रकृती बिघडली असून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांना रांची येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला हलवण्यात आले आहे. त्यांची किडनी फक्त २५ टक्के काम करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

चारा घोटाळाप्रकरणी चार गुन्हे दाखल

लालू प्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळाप्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत. सरकारी खजिन्यातून अवैधरित्या पैशे काढल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे आरोप सिद्ध झाले असून त्यांना शिक्षा झाली आहे. देवघर येथील खजिनातून पैसे काढल्याप्रकरणी एक खटला, चाईबासा खजिना घोटाळ्याचे दोन खटले आणि दुमका खजिन्यातून पैसे काढल्याप्रकरणी चौथा गुन्हा दाखल आहे. याती तिन्ही खटल्यात त्यांना जामीन मिळाला असून दुमका खटल्यात जामीन मिळाला नाही. त्यामुळे आज जर त्यांना जामीन मिळाला तर लालू प्रसाद यादव बाहेर येतील.

लालूंची तुरुंगातून सुटका करण्यात यावी यासाठी त्यांचे पुत्र आणि आमदार तेजप्रताप यादव यांने मोहिम सुरू केली आहे. लालूंच्या सुटकेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ५० हजार पत्रे पाठविण्यात आली आहेत. मानवतेच्या भावनेतून त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी या पत्रांद्वारे करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.