दिल्ली/वाराणसी/ प्रयागराज : ज्ञानवापी मशिदीच्या वादावर ( Gyanvapi Mosque Dispute ) आज सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court Of India ) सुनावणी होणार आहे. वाराणसीच्या अंजुमन इनजानिया मशिदीच्या ( Anjuman Injaniya Mosque Varanasi ) व्यवस्थापन समितीने कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या मशिद परिसराच्या सर्वेक्षणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. वाराणसीतील ज्ञानवापी वादाबाबत मस्जिद समितीने लोकांना आवाहन केले आहे की, किमान लोकांनी शुक्रवारच्या नमाजला पोहोचावे. दुसरीकडे काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादाच्या संदर्भात दाखल याचिकांवर अलाहाबाद उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार ( Allahabad HC Hearing Gyanvapi Mosque Dispute ) आहे. न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांच्या एकल खंडपीठात दुपारी 12 वाजता सुनावणी सुरू होणार आहे. आजच्या सुनावणीत प्रथम स्वयंभू देव विश्वेश्वर यांच्या (हिंदू बाजू) बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे.
गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरसिंह यांच्या खंडपीठाला अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, दिवाणी खटल्यात हिंदू भक्तांची बाजू मांडणारे मुख्य वकील हरी शंकर जैन यांची तब्येत खराब आहे. वकील विष्णू शंकर जैन यांनी शुक्रवारी सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. खंडपीठाने गुरुवारी युक्तिवाद नोंदविला आणि दिवाणी न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत कार्यवाही पुढे न ठेवण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
उच्च नायालयात सुरु असलेल्या मागील सुनावणीत हिंदू पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. प्रथम हिंदू बाजू आपले उर्वरित युक्तिवाद पूर्ण करेल. त्यानंतर दोन्ही मुस्लीम पक्ष आपला युक्तिवाद करणार आहेत. वाराणसी जिल्हा न्यायालयात 31 वर्षांपूर्वी 1991 मध्ये दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी करता येईल की नाही हे न्यायालयाने ठरवायचे आहे.
मुस्लीम पक्षाचे म्हणणे आहे की, प्रार्थनास्थळ कायदा १९९१ अंतर्गत या खटल्याचा पाठपुरावा करता येणार नाही. याअंतर्गत अयोध्या वगळता देशातील अन्य कोणत्याही धार्मिक स्थळाच्या स्वरुपात कोणताही बदल करता येणार नाही. या कायद्यानुसार, देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी 15 ऑगस्ट 1947 रोजी जो धार्मिक स्थळाचा दर्जा होता, तोच दर्जा कायम राहील.
काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशीद वादात मशीद व्यवस्था समिती आणि यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड हे मुस्लिम पक्षकार आहेत. दोन्ही पक्षांच्या वतीने एकूण सहा याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुस्लीम पक्षांची चर्चा संपल्यानंतर आता वेळ पडल्यास यूपी सरकारची बाजूही ठेवली जाईल.