ETV Bharat / bharat

Health Workers Burn Newborn With Garbage: माणुसकीला काळीमा ; रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नवजात अर्भकाला जाळले कचऱ्यात - रुग्णालयातील परिचारिका

रुग्णालयातील परिचारिका आणि दाईने नवजात अर्भकाला कचऱ्यात जाळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना झारखंडमधील गढवा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद सेठ यांनी दिले आहे.

Health Workers Burn Newborn With Garbage
घटनास्थळ
author img

By

Published : Jun 11, 2023, 8:51 PM IST

रांची : रुग्णालयातील परिचारिका आणि दाईने नवजात अर्भकाला कचऱ्यासोबत जाळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गढवा जिल्ह्यातील माझियान येथे घडली आहे. एका गरोदर महिलेची प्रसुती रुग्णालयात झाल्यानंतर परिचारिका आणि दाईने बाळाला कचऱ्यात टाकून जाळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने आरोपी परिचारिका आणि दाईवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली घटना : माझियाव येथील गरोदर महिला मधु देवी यांना प्रसूती वेदना होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर मधु देवी यांनी मृत मुलाला जन्म दिला. घटनास्थळी उपस्थित परिचारिकेने आणि दाईने मधु देवीने मृत मुलाला जन्म दिल्याचे नातेवाईकांना सांगितले. नवजात अर्भकाच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी नातेवाईक बाजारात गेले होते. त्याचदरम्यान परिचारिका, दाई आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कचऱ्यासह नवजात अर्भकाला जाळून टाकले.

गोठ्यात जाळला जात होता कचरा : आरोग्य केंद्राशेजारी एका गोठ्यात कचरा जाळला जात होता. या गोठ्यात नवजात अर्भकाचा मृतदेह टाकण्यात आला होता. गोठ्यात जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यात नवजात अर्भकाचा मृतदेह पूर्णपणे जळाला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. मृत बालकाचा मृतदेह नकळत गळफास लावून जाळण्यात आल्याचे नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे.

मानवतेला लज्जास्पद घटना, दोषींवर करणार कारवाई : नवजात अर्भकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला हवा होता. मात्र कर्मचाऱ्यांनी तो नातेवाईकांना न देता जाळल्याची घटना मानवतेला लज्जास्पद असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद सेठ यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पलामूच्या सातबरवा पोलीस स्टेशन हद्दीतील लाहले भागात मधुदेवीचे सासरचे घर आहे. ती प्रसूतीसाठी तिच्या माहेरी गेली होती. चिमुकल्याचा मृतदेह गुंडाळीत टाकण्यात आल्याची माहिती नसल्याचे कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने सांगितले आहे. मात्र ड्यूटीवर असलेल्या दाईने असे केल्याची माहिती या परिचारिकेने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.