नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने पेगाससची खरेदी केली का, हो किंवा नाही एवढंच उत्तर आम्हाला हवं आहे असे म्हणत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी सर्व विरोधक राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकारविरोधात एकवटल्याचे चित्र बघायला मिळाले.
राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांची एकजूट
यावेळी सर्व विरोधक काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात एकवटल्याचे चित्र दिसून आले. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले. तत्पूर्वी पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीचेही नेतृत्व राहुल गांधींनीच केले. या पत्रकार परिषदेत सर्व विरोधकांनी एकमुखाने चर्चेची मागणी केली. राहुल गांधींनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सरकारने प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी अशी मागणी केली.
विरोधक एकवटले
पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारविरोधात एकवटल्याचे चित्र बुधवारी बघायला मिळाले. पेगासस मुद्द्यावरून चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधकांनी बुधवारी संसद भवन परिसरात एकत्रित पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला. सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढत आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असून सरकारने विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी असे विरोधक यावेळी म्हणाले.
हेही वाचा - संसदेचे काम चालविण्याची सत्ताधारी पक्षावर अधिक जबाबदारी- संजय राऊत