नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनकुमार चौबी यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री व आरोग्य राज्यमंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. याचा अर्थ मोदी सरकार हे कोरोना महामारीचे व्यस्थापन करताना सपशेल अपयशी ठरल्याची कबुली असल्याचा टोला पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला लगावला आहे. चिदंबरम म्हणाले, की राजीनाम्यामुळे मंत्र्यांना हा धडा मिळाला आहे. जर योग्य गोष्टी असेल तर त्याचे श्रेय पंतप्रधानांना जाणार आहे. जर योग्य गोष्टी नसतील तर मंत्री हा अपयशी व्यक्ती असणार आहे. अप्रत्यक्षपणे आज्ञाधारकपणा आणि प्रश्न न विचारता अधीनता याची किंमत पंतप्रधान मोदी चुकविणार आहेत का? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी बड्या केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, कोरोनाची समस्या हाताळण्यावरून तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यावर सातत्याने काँग्रेसने टीका केली होती.
हेही वाचा-LIVE : MODI 2.0 Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळ विस्तार शपथविधीचे थेट प्रक्षेपण
१२ मंत्र्यांचे राजीनामे-
केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तारापूर्वी आज केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र दिसून आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद आणि केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामे दिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळातील १२ मंत्र्यांचे राजीनामे हे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत.
हेही वाचा-शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी