ETV Bharat / bharat

पुन्हा केंद्र VS पश्चिम बंगाल; हरे कृष्णा द्विवेदी नवे मुख्य सचिव, बंदोपाध्याय मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी

अलप्पन बंदोपाध्याय यांना मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळे आता केंद्र सरकारविरूध्द राज्य सरकार हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

author img

By

Published : May 31, 2021, 5:46 PM IST

पुन्हा केंद्र VS पश्चिम बंगाल
पुन्हा केंद्र VS पश्चिम बंगाल

कोलकाता - पश्चिम बंगालचे नवीन मुख्य सचिव म्हणून हरे कृष्णा द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आतापर्यंत पश्चिम बंगालचे मुख्य सचिव असलेले अलप्पन बंदोपाध्याय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुख्य सल्लागारपदी असतील. अलप्पन बंदोपाध्याय यांना मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळे आता केंद्र सरकारविरूध्द ममता बॅनर्जी हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अलप्पन बंदोपाध्याय यांची बदली केंद्र सरकार रोखत नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अलप्पन बंदोपाध्याय 31 मेल निवृत्ती होणार होते. मात्र, त्यांची तीन महिन्यांसाठी मुदतवाढ करण्यात आली होती. आता ममता बॅनर्जी यांनी त्यांची मुदतवाढ रोखून त्यांना मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केले आहे. दरम्यान, आज सकाळीच ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंदोपाध्याय यांच्या बदलीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.

कोण आहेत अल्पन बंडोपाध्याय ?

अल्पन बंडोपाध्याय हे 1987 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. बंड्योपाध्याय हे 31 मे ला सेवानिवृत्त होणार होते. मात्र, मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या विनंती नंतर केंद्राकडून त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. केंद्र आणि राज्याच्या वादात केंद्राकडून बंदोपाध्याय यांची बदली दिल्लीत करण्यात आली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी केंद्राला पत्र लिहित त्यांची बदली रोखण्याची विनंती केली होती.

नेमक काय घडलं?

पश्चिम बंगालला 'यास' चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उशिरा हजेरी लावली आणि नुकसान झालेल्या भागाचा अहवाल देत तेथून निघून गेल्या, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. यावेळी ममता यांच्यासोबत मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय होते. त्यानंतर केंद्राने बंडोपाध्याय यांना तात्काळ मुख्य सचिव पदावरुन हटवून दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. गृहमंत्रालयाने बंडोपाध्याय यांना सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कार्मिक व प्रशिक्षण विभागात (DoPT- Department of Personnel and Training) उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने जबाबदारीतून मुक्त न केल्यामुळे बंडोपाध्याय दिल्लीत उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानभवनातील बैठकीला हजेरी लावली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.