उदयपूर : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशाने दोन वर्षानंतर पुन्हा आपले लग्न केले आहे. त्याच्या जवळच्या खास मित्रांसह या दोघांनी पुन्हा सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. हार्दिक नताशाने मंगळवारी ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. यावेळी हार्दिक आणि नताशा पठाण चित्रपटाच्या गाण्यांवर चांगलेच थिरकले. त्यांच्या नृत्याचा व्हिडिओ हार्दिकने त्याच्या सोशल माध्यमावरील अकाऊंटवर शेअर केला आहे. आज हे दोघेही हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत.
हिंदू परंपरेनुसार आज करणार लग्न : भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशाने ख्रिश्चन पद्धतीने मंगळवारी लग्न केले आहे. यावेळी त्या दोघांनीही पठाण चित्रपटाच्या गाण्यांवर जोरदार नृत्य केले. आज हे दोघेही हिंदू परंपरेनुसार लग्न करणार आहेत. या अगोदर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा यांनी मे 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. तर आज हे दोघेही हिंदू परंपरेने लग्न करत आहेत. त्यामुळे हार्दिक आणि नताशा तब्बल तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
रॉयल वेडींग पार्टीत शाही पाहुणे : हार्दिक पांड्या आणि नताशाने आपल्या लग्नाची शाही पार्टी दिली. या पार्टीत हिन्दी बॉलीवूडच्या गाण्यांवर या दोघांनी तुफान नृत्यू केले. त्यातही हार्दिक पांड्याने नुकताच रिलिज झालेल्या पठाण चित्रपटाच्या गाण्यावर जोरदार नृत्य केले. त्यांच्यासह या पार्टीत ईशान किशन, दिनेश कार्तिक, अजय जडेजा, महेंद्र सिंह धोनी, व्हिव्हिएस लक्ष्मण, उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे, केजीएफ चित्रपटांचा अभिनेता रॉकी यश देखील सहभागी झाले होते.
उदयपूरच्या शाही हॉटेलमध्ये सुरू आहे शाही विवाह सोहळा : उदयपूरच्या शाही हॉटेलमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशाच्या शाही विवाहसोहळ्याचा समारंभ सुरू आहे. उदयपूरच्या हॉटेल राफेल्समध्ये मागील तीन दिवसापासून हा सोहळा सुरू आहे. या शाही विवाह सोहळ्यातील पाहुण्यांसाठी हायप्रोफाईल शाही मेन्यूचे आयोजन करण्यात आले आहे. यात राजस्थानी, गुजराती, आणि साऊथ इंडियान डिशेसचा समावेश आहे. त्यासह राजस्थानच्या सुप्रसिद्ध दाल बाटी चुरमा आणि राजस्थानी डिशेसचाही समावेश आहे.
पत्नीसोबत पोहोचले आकाश अंबानी : उदयपूर येथील शाही हॉटेलमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशाचा विवाहसोहळा सुरू आहे. आज हार्दिक आणि नताशा हिंदू परंपरेनुसार विवाह करणार आहेत. या विवाह सोहळ्यात उपस्थित राहणासाठी देशभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. त्यातच सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आपल्या पत्नीसह उदयपूरला पोहचले.
हेही वाचा - Violence in Palamu : शाळेत सुरू होती प्रार्थना अन् बाहेर हिंसाचार ; पलामू हिंसाचारात अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पोहोचवले घरी