ETV Bharat / bharat

Hardeep Singh Nijjar : प्लंबर ते कुख्यात खलिस्तानवादी; कोण आहे हरदीपसिंग निज्जर?

Hardeep Singh Nijjar : भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलेला खलिस्तानवादी समर्थक हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर पंजाबमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप होता. या वर्षीच्या जून महिन्यात निज्जरची हत्या करण्यात आली होती. या हत्येवरुन आता भारत आणि कॅनडामधील राजकीय वातावरण तापलं आहे.

Etv Bharat
हरदीपसिंग निज्जर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 1:15 PM IST

नवी दिल्ली : Hardeep Singh Nijjar : खलिस्तानवादी समर्थक नेता हरदीपसिंग निज्जरची कॅनडामध्ये दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या मारून हत्या केली होती. निज्जरला भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलं होतं. तो गुरुनानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्षही (Khalistan Terrorist Hardeep Singh Nijjar) होता. जालंधरमधील एका खेड्यातील रहिवासी असलेल्या निज्जरचा भारतात (Who was Hardeep Singh Nijjar) बंदी असलेल्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या फुटीरतावादी संघटनेशी संबंध (Hardeep Singh Nijjar Profile) होता. ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी सार्वमत घेण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हत्येवरुन आता भारत आणि कॅनडामध्ये तणाव (India Canada Relations) निर्माण झालाय.

शांतता बिघडवण्याचा होता कट : 31 जानेवारी 2021 रोजी जालंधर येथे हिंदू पुजारी कमलदीप शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं गेल्या वर्षी निज्जरसह चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. एनआयएच्या म्हणण्यानुसार, निज्जर यानं हिंदू पुजाऱ्याची हत्या करून पंजाबमधील शांतता बिघडवण्याचा आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा कट रचला होता.

पंजाब पोलिसांनी केली होती प्रत्यार्पणाची मागणी : पंजाबमधील दहशतवादी कारवायांमध्ये निज्जर याचा सहभाग असल्याच्या आरोपावरून भारतानं कॅनडाच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितलं होतं. गेल्या वर्षी, पंजाब पोलिसांनी निज्जर याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. 23 जानेवारी 2015 रोजी जारी केलेल्या लुकआउट परिपत्रक आणि 14 मार्च 2016 रोजी जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या अनुषंगानं पोलीस त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होते.

निज्जर सुरुवातीला होता प्लंबर : मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हा जालंधरच्या भारसिंह पुरा गावचा रहिवासी असून तो 1996 मध्ये कॅनडाला गेला होता. कॅनडाला गेल्यानंतर त्यानं तिथं प्लंबर म्हणून काम केलं. अचानक हरदीपसिंग निज्जरचा खलिस्तानवादी समर्थक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढला होता. त्याचबरोबर त्याच्या संपत्तीतही सातत्यानं वाढ होऊ लागली होती. कॅनडाचं नागरिकत्व मिळाल्यानंतर निज्जरनं तेथे लग्नही केलं होतं.

निज्जरवर दहापेक्षा अधिक गुन्हे होते दाखल : दहशतवादी कटात निज्जरचा सतत सहभाग असल्यानं त्याच्याविरुद्ध सुमारे 10 एफआयआरही नोंदवण्यात आले होते. 2014 मध्ये खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर यानं आध्यात्मिक नेता बाबा भनियारा यांच्या हत्येचा कट रचला होता. निज्जरच्या दहशतवादी योजना पाहून भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी त्याला फरारी घोषित केलं आणि त्याच्यावर सुमारे 10 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. या वर्षी जून 2023 मध्ये हरदीपसिंग निज्जरची कॅनडाच्या एका शहरात हत्या करण्यात आली होती. मंदिराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमध्ये निज्जर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

हेही वाचा -

  1. India Canada Diplomat : जशास तसं, भारताचे कॅनडाच्या राजदूताला ५ दिवसात देश सोडण्याचे आदेश
  2. Canada Indian Diplomat : कॅनडातून भारतीय राजदूताची हकालपट्टी, पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंनी केले गंभीर आरोप; भारताचं प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.