ETV Bharat / bharat

Yearly Horoscope 2023 : भाग्याच्या रेषेला आनंदाची किनार देणारं नवं वर्षे, जाणून घ्या, तुमच्या राशींवर कसा होईल ग्रहांचा परिणाम - वार्षिक राशी भविष्य 2023 मराठी

जुने वर्षे जाऊन, नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. आपले नवीन वर्षे चांगले जावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच नवीन वर्षात आपल्या आयुष्यात काय बदल होतील, हे जाणुन घेण्याची प्रत्येकाला उत्सुक्ता असते. चला तर मग नवीन वर्षात 'या' 12 राशींचे 'वार्षिक राशी भविष्य' काय असेल ते जाणुन घेऊया. Yearly Horoscope 2023 . Zodiac Signs Prediction . Impact And Remedies . Shani . Rahu . Ketu . Mercury . Transit . Yearly Rashi Fortune 2023 Marathi . Happy New Year 2023. Yearly Horoscope 2023 In Marathi

Yearly Horoscope 2023
वार्षिक राशी भविष्य 2023
author img

By

Published : Dec 31, 2022, 12:11 AM IST

Updated : Jan 1, 2023, 1:21 PM IST

वर्ष २०२३ च्या सुरूवातीलाच शनी आपली राशी बदलत आहे. धनु राशीतून शनी मकर राशीत प्रवेश करेल. शनिशिवाय राहू, केतूसह अनेक मोठे ग्रहांचे गोचर होईल. ग्रहांच्या राशीबदलाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. ग्रहाच्या मार्गक्रमणाचा काहींवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक परिणाम होईल. अशा परिस्थितीत मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींवर नवीन वर्षात ग्रहांचा प्रभाव आणि उपाय कसा असेल हे जाणून घेऊया. Yearly Horoscope 2023 . Zodiac Signs Prediction . Impact And Remedies . Shani . Rahu . Ketu . Mercury . Transit . Yearly Rashi Fortune 2023 Marathi . Happy New Year 2023 . Yearly Horoscope 2023 In Marathi

  1. मेष राशी : वर्षाच्या सुरवाती पासूनच आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. वर्षाच्या सुरवातीस एखादी चांगली संधी हातून निसटण्याची शक्यता असल्याने वाणीतील कठोरपणा मात्र टाळावा लागेल. स्वतःवर नीरंकुशतेचा टीळा लावण्या ऐवजी योग्य व अयोग्य ह्यातील फरक समजून मार्गक्रमण केलेत तर ह्या वर्षी प्रगती करण्यात आपणास मदत होईल. धार्मिक दृष्ट्या आपण नक्कीच प्रगती कराल. धार्मिक बाबी व आध्यात्मिक प्रवृतीत आपण खूपच आनंद मिळवू शकाल. आपण एखाद्या मंदिरास दान देऊ शकाल किंवा एखाद्या संस्थेत सहभागी होऊन समाजसेवा करू शकाल. वर्षाच्या सुरवातीस रवी व बुध आपल्या भाग्यस्थानी असतील, त्यामुळे वडिलांशी संबंध सुधारतील किंवा त्यांच्याकडून आपणास एखादा मोठा लाभ होऊ शकेल. मार्च ते मे दरम्यानचे दिवस अनुकूल असतील. ह्या दरम्यान आपण आपल्या मजबूत उर्जा शक्तीच्या मदतीने अनेक कार्यात यश संपादित कराल व कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकाल. मे ते जुलै दरम्यानचे दिवस चढ – उतारांचे असतील. ह्या दरम्यान कौटुंबिक जीवनात कलहजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या मातेची प्रकृती बिघडू शकते. असे असले तरी आपणास एखादी मोठी मालमत्ता खरेदी करण्याचा फायदा होऊ शकतो. तसेच जमीन – जुमल्याशी संबंधित बाबीत उत्तम यश प्राप्त होऊ शकते. ऑगस्ट व ऑक्टोबर दरम्यान आपला राशी स्वामी मंगळ षष्ठ स्थानी असेल व त्यामुळे कायद्याशी संबंधित बाबीत आपणास यश प्राप्ती होईल व न्यायालयीन निकाल आपल्या बाजूने लागेल. ह्या दरम्यान आपण विरोधकांना चारी मुंड्या चीत करू शकाल. हे दिवस आपणास प्रबळता प्रदान करतील. नोव्हेंबर व डिसेंबर दरम्यान आपल्या कार्यात चढ – उतार येऊन विलंब होण्याची शक्यता असल्याने आपणास थोडे सावध राहावे लागेल. निष्कारण व्यस्त ठेवणाऱ्या प्रवृतींपासून दूर राहावे. वर्षाच्या अखेरच्या दोन दिवसात आपणास एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळण्याची शक्यता आहे. आपणास एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. प्रवासाच्या दृष्टीने वर्षाचे सुरवातीचे दिवस अनुकूल आहेत. आपणास एखादी तीर्थयात्रा करण्याची संधी सुद्धा मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होऊन आपणास समाधान लाभेल. वर्षाचे मधले दिवस जवळजवळ सामान्यच राहतील. ह्या दरम्यान विशेष प्रवास होणार नसले तरी आपण आपल्या कुटुंबियांसह लहान – सहान प्रवासास जाऊ शकाल. त्यामुळे कौटुंबिक जीवन आनंदित होईल. नोव्हेंबर ते वर्षाच्या अखेरच्या दिवसांपर्यंत आपण प्रवासात व्यस्त असू शकता. ह्या दरम्यान आपणास विदेश प्रवास करण्याची संधी व कामा निमित्त दूरवरच्या प्रवासाचे योग येतील. अशा प्रकारे हे दिवस आपल्यासाठी आनंददायी होतील, परंतु त्यामुळे आपणास भरपूर खर्च सुद्धा करावा लागेल.
    Yearly Horoscope 2023
    मेष राशी
  2. वृषभ राशी : २०२३ ची सुरवात आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपल्या राशीतून होणाऱ्या मंगळाच्या भ्रमणामुळे आपला स्वभाव क्रोधीत झाल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपणास काही त्रास सोसावा लागू शकतो. आपणास मानसिक तणाव सुद्धा जाणवेल. असे असले तरी हळू हळू परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल व आपण जीवनात प्रगती पथावर विराजमान व्हाल. हे वर्ष आपल्या आर्थिक स्थितीत चढ – उताराने भरलेले आहे. एकीकडे आर्थिक बाबतीत उत्तम परिणाम मिळून प्राप्तीत वृद्धी होत राहील तर वर्षाच्या अखेरच्या दोन महिन्यां पर्यंत आपल्या खर्चाची यादी वाढतच जाईल. आपली इच्छा असो वा नसो आपणास हे खर्च करावेच लागतील. असे असूनही नोव्हेंबर – डिसेंबर महिन्या दरम्यान आपल्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर उमटेल व आपण मजबूत व्हाल. ह्या वर्षी आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावीच लागेल, अन्यथा आजारपण येऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. ह्या वर्षात आपणास दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात. आपणास परदेश प्रवासाची संधी सुद्धा मिळू शकते. अशी संधी मिळाल्यास आपण तेथे दीर्घकाळ राहू शकाल. अधिक दूरवरच्या ठिकाणी जाण्या योग्य परिस्थिती निर्माण होऊन ह्या वर्षात आपण भरपूर प्रवास कराल. वर्षाच्या सुरवातीस सुद्धा एखादा प्रवास करावा लागू शकतो. आपला स्वभाव कष्टाळू असून ह्या वर्षी आपण कशाचीही तमा न बाळगता भरपूर कष्ट कराल. त्यामुळे आपणास शारीरिक थकव्याचा त्रास होऊ शकेल. जर ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर हे वर्ष आपणास सुस्थितीत नेऊन ठेवणारा आहे. कामातील व्यस्ततेमुळे आपण कुटुंबीयां पासून काहीसे दूर राहाल व त्यांना खूप कमी वेळ देऊ शकणार असल्याने आपणास कुटुंबियांशी योग्य तितका समन्वय साधावा लागेल. असे असून सुद्धा आपल्या भावंडांचे सहकार्य आपणास लाभेल. आपल्याहून एखादे मोठे भावंड असल्यास वर्षभर त्याचे सहकार्य आपणास मिळेल. वर्षाच्या उत्तरार्धात कुटुंबात एखादे शुभ कार्य सुद्धा होईल. पूजा – अर्चा करण्यात सुद्धा आपणास भरपूर खर्च करावा लागेल.
    Yearly Horoscope 2023
    वृषभ राशी
  3. मिथुन राशी : आपल्यासाठी २०२३ हे वर्ष बरेच काही नावीन्याने भरलेले आहे. जानेवारी पासूनच आपले भाग्य फळफळून आपणास नशिबाची साथ मिळू लागेल. आपली प्रलंबित कामे होऊ लागतील. आर्थिक आघाडीवर सुद्धा उन्नती होईल. हे वर्ष कौटुंबिक जीवनासाठी खूपच चांगले असून कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल, ज्यात कौटुंबिक ऐक्य व जिव्हाळा असल्याचे दिसून येईल. वर्षाच्या सुरवातीस मंगळाचा प्रभाव आपल्या वैवाहिक जीवनावर होण्याची संभावना आहे. खर्चात वाढ होणार असल्याने आपणास प्राप्तीचे ठोस स्रोत शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या वर्षाच्या सुरवातीस आपणास परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. आपल्यापैकी काहीजण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वारंवार प्रवास करतील. ह्या वर्षाच्या मध्यास बरेच प्रवास करू शकाल. जर आपल्यावर कोर्टात खटला चालू असेल तर ह्या वर्षी त्याचा निकाल येऊ शकतो. असे असले तरी जानेवारी महिन्यात काही समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने थोडे शांत राहावे लागेल. त्या नंतरच्या दिवसात कोर्ट - कचेरीच्या कामात यश प्राप्ती होण्याचे दृष्टिपथास येत आहे. आपल्याला प्रकृतीच्या बाबतीत मात्र जागरूक राहावे लागेल, अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. वर्षाच्या सुरवातीस आपणास मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपण जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्यात मित्रांची मदत आपल्या कामी येईल. आपण व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. आपणास आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी विशेष कष्ट करावे लागणार नाहीत. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे ह्या वर्षी सुखद परिणाम प्राप्त होतील. आपला आत्मविश्वास उंचावेल, जो कोणत्याही अवघड परिस्थितीतून आपणास प्रगतीपथावर घेऊन जाईल. आपल्या मोठ्या भावंडांशी संबंध बिघडण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल. वर्षाच्या सुरवातीस एखाद्याशी भांडण होण्याची संभावना असल्याने कोणाशीही उलट - सुलट बोलण्याचे टाळावे. हे भांडण अनेक दिवस चालेल व त्यामुळे आपणास त्रास होईल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपल्या भावंडांचे आपणास सहकार्य मिळेल. त्यामुळे आपली कामे विना अडथळा पूर्णत्वास जातील. मित्रांसह मौज - मजा करू शकाल. आपली स्फूर्ती वाढेल. ह्या वर्षात आपली परिस्थिती खूप चांगली होईल.
    Yearly Horoscope 2023
    मिथुन राशी
  4. कर्क राशी : २०२३ चे वर्ष आपणास अनुकूल असणार आहे. वर्षाच्या सुरवाती पासूनच नशिबाची साथ आपणास मिळत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपली बरीचशी कामे होऊ शकतील. आपली प्रलंबित कामे सुद्धा पूर्णत्वास जातील. आपण अनेक वर्षांपासून बाळगून असलेली इच्छा ह्या वर्षी पूर्ण होईल. ह्या वर्षी आपण भरपूर प्रवास कराल. ह्यात तीर्थयात्रेचा समावेश सुद्धा असेल, त्यामुळे आपणास मानसिक शांतता लाभेल. धर्मकार्याशी संबंधित विषयात आपली आस्था व श्रद्धा वाढून आपण अशा कार्यात सहभागी सुद्धा व्हाल. त्यामुळे आपणास मान - सन्मान सुद्धा प्राप्त होईल. आपण एखाद्या चांगल्या सामाजिक संस्थेत सुद्धा सहभागी होऊ शकाल. त्यामुळे आपणास काही नवीन काम करण्याची संधी सुद्धा मिळेल जो आपला सामाजिक दर्जा उंचावेल. ह्या वर्षी परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. आपण जर त्यासाठी अर्ज केला नसेल तर तो लवकरात लवकर केल्यास आपणास त्यात यश प्राप्त होईल. ह्या वर्षी आपणास प्राप्ती चांगली होऊन आपला आत्मविश्वास उंचावेल. त्यामुळे आपण काही नवीन कामे हाती घेऊन त्यात यशस्वी सुद्धा व्हाल. ह्या वर्षात कौटुंबिक जीवनात असंतोष बघावयास मिळेल. कुटुंबियांसह राहून सुद्धा आपणास एकटेपणा जाणवेल. आपले मन कुटुंबात रमणार नाही. आपण घरी याल ते सुद्धा एक कर्तव्य म्हणूनच. कुटुंबियांना आपले हे वर्तन रुचणार नाही व ते आपणास त्या संबंधी तक्रार करतील. सरकारी क्षेत्राशी सुद्धा चांगला संपर्क राहील. कामात प्रगती साधण्यास मदतरूप होईल असे सहकार्य काही मित्रां कडून आपणास मिळेल. कौटुंबिक बाबतीत सुद्धा आपल्या पाठीशी ते उभे राहतील. आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावू शकतील अशा काही नवीन लोकांना भेटण्याची संधी ह्या वर्षी आपणास मिळेल. ह्या वर्षी नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. भावंडांशी संबंधात सुधारणा होईल, परंतु त्यासाठी वर्षाची सुरवात काहीशी कमकुवतच होईल.
    Yearly Horoscope 2023
    कर्क राशी
  5. सिंह राशी : हे वर्ष आपल्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टी घेऊन येणारे आहे. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपल्या आत्मविश्वासाचे स्तर उंचावलेले असेल. देवावर आपली श्रद्धा वाढून आपण धार्मिक कार्यात सुद्धा सहभागी होऊ लागाल. ह्या वर्षात आपण एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन सुद्धा करू शकता. त्यामुळे समाजात आपली पत वाढून आपणास प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. काही मोठ्या व्यक्तींशी संपर्क होऊन येणाऱ्या काळात आपणास चांगला लाभ होईल. हे वर्ष गुंतवणुकीसाठी आपणास अनुकूल असल्याने गुंतवणुकीतून आपल्याला चांगला परतावा मिळेल. परंतु अल्प कालीन गुंतवणूक करण्या ऐवजी दीर्घ कालीन गुंतवणूक जास्त फलदायी ठरेल. तेव्हा आपण त्यानुसार गुंतवणूक करावी. वर्षाच्या सुरवातीस आपण एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. कदाचित आपण आपणास प्रिय असलेल्या व जवळच्या व्यक्तींसह फिरावयास जाल. त्याने आपणास नवीन ऊर्जा मिळेल व जीवनातील सर्व समस्यांवर मात करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. ह्या वर्षी आपणास भरपूर प्रवास करण्याची संधी मिळेल. काही दूरवरचे विशेषतः परदेशातील प्रवास सुद्धा संभवतात. ह्या वर्षी आरोग्याच्या बाबतीत आपण काहीसे कमकुवत राहाल. तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक लहान - सहान तक्रारी सुद्धा मोठे स्वरूप धारण करण्याच्या शक्यतेमुळे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. स्वतःसाठी खरेदी सुद्धा करावी. विशेषतः वर्षाच्या मध्यास आपणास खरेदी करण्याची संधी मिळेल, ज्यात आपणास भरपूर सवलतीत काही महागड्या वस्तू प्राप्त होऊ शकतील. ह्या वर्षी अनेक वर्षां पासून आपल्या मनात घर करून असलेली एखादी इच्छा पूर्ण झाल्याने आपणास अतिशय आनंद होईल. वर्षाच्या सुरवातीस आपण आपल्या भावंडांच्या एखाद्या समस्येने त्रस्त होण्याची शक्यता आहे. परंतु पहिला महिना संपल्यावर हळूहळू परिस्थितीत बदल होऊ लागेल. कदाचित आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरल्याने कुटुंबात आनंद पसरेल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींकडे आपण आकर्षित व्हाल व ती खरेदी करण्यात सुद्धा यशस्वी होऊ शकाल. त्यामुळे आपले आर्थिक स्तर सुद्धा उंचावेल.
    Yearly Horoscope 2023
    सिंह राशी
  6. कन्या राशी : हे वर्ष आपल्यासाठी मिश्रा फलदायी आहे. ह्या वर्षी आपणास सर्वात जास्त आपल्या कुटुंबाची काळजी वाटेल. काही गोष्टी अशा असतील कि ज्या कौटुंबिक वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतील. आपला व्यवहार सुद्धा लोकांना समजू शकणार नाही. आपले म्हणणे काय आहे व आपणास काय करावयाचे आहे ते त्यांना समजणार नाही. आपल्या बोलण्या - वागण्यात फरक जाणवल्याने आपले कौटुंबिक संबंध बिघडण्याची संभावना आहे. ह्याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. प्रॉपर्टीशी संबंधित बाबीत आपणास यश प्राप्ती होऊ शकते. ह्या वर्षी आपण एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकता. वर्षाच्या मध्यास वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने आपण एखादे मोठे वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. सासुरवाडी कडील लोकांशी वाद होण्याची संभावना असल्याने वर्षाचे सुरवातीचे दिवस धीराने घालवण्याचा प्रयत्न करा. ह्या वर्षाचा एप्रिल महिना प्रवासासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्या नंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात प्रवास करून आपण आनंदित व्हाल. ह्या प्रवासांमुळे आपण खुश व्हाल. आपल्या लोकांसह प्रवास केल्याने आपले मन सुद्धा आनंदित होईल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपणास मित्रांचा पाठिंबा मिळेल. वर्षाच्या सुरवातीस शासना कडून सुद्धा काही चांगला लाभ मिळू शकतो. वडिलांशी आपले मतभेद होण्याची संभावना असल्याने त्यांच्याशी संबंध सुधारण्याकडे लक्ष द्यावे. सध्या आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत काहीसे उदासीन असाल, तेव्हा त्याकडे थोडे लक्ष द्यावे. ह्या वर्षी आपणास यश प्राप्त होईल. आपल्या मनात नव - नवीन विचार येऊन आपण आपल्या व्यवसायात प्रगती साधू शकाल. सध्या नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखादा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतील, परंतु सध्या आपण नोकरीच करावी असा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपणास जर व्यवसायच करावयाचा असेल तर जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा. ह्या व्यतिरिक्त आपण पहिल्या पासूनच जर व्यवसाय करत असाल तर आपण आपल्या व्यवसाया बरोबर जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकता. म्हणजे एकाहून अधिक व्यवसाय केल्यास यश मिळेल. आपणास आपल्या मातेचा पाठिंबा मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने व आर्थिक मदतीने सुद्धा आपण आपल्या व्यवसायात प्रगती साधू शकाल. आपण जर राजकारण किंवा कायद्याशी संबंधित क्षेत्रात कार्यरत असाल तर ह्या वर्षी आपणास एखादे मोठे यश मिळू शकेल कि ज्यामुळे आपणास व आपल्या कुटुंबास आनंद साजरा करण्याची संधी मिळेल.
    Yearly Horoscope 2023
    कन्या राशी
  7. तूळ राशी : २०२३ चे वर्ष आपल्यासाठी खूपच चांगली बातमी घेऊन येत आहे. आपणास आपल्या कार्यक्षेत्रात पाय घट्ट रोवण्याची व आपल्या योजनांना साकारण्याची संधी मिळेल. आपल्या मनात जर एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार येत असेल तर ह्या वर्षी आपणास त्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदित राहील. कामात व्यस्त राहून सुद्धा आपण आपल्या कुटुंबियांना आवश्यक तितका वेळ देऊ शकाल. तसेच त्यांच्या बऱ्या - वाईट प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. असे झाल्याने आपले कौटुंबिक नाते मजबूत होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल. वर्षाच्या सुरवातीस आपल्या मातेची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने त्यांची काळजी घ्यावी. ह्या वर्षात आपण मध्यम अंतरावरील प्रवास जास्त प्रमाणात कराल. ह्या वर्षी आपणास आपल्या लठ्ठपणावर लक्ष ठेवावे लागेल. भोजनात पोषक तत्वांची कमतरता व चरबीयुक्त पदार्थ यांमुळे कोलेस्ट्रॉल व लठ्ठपणा वाढण्याची संभावना आहे. आपण जर कायदे तज्ञ असाल तर हे वर्ष आपणास यशाच्या शिखरावर नेऊ शकेल. आपणास मित्रांचे सहकार्य मिळेल. ते आपल्या पाठीशी उभे असलेले दिसतील. आपण एखाद्या नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याचा सुद्धा प्रयत्न कराल. ह्या वर्षी आपण आपल्या भावना मनातच दाबून ठेवाल व जीवनात समतोलपणा राखण्यास महत्व द्याल. अनेकदा आपण स्वतःवर अन्याय व आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष कराल. त्याचे गंभीर परिणाम होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. ज्या व्यक्तीवर आपला विश्वास असेल फक्त अशा व्यक्ती समोरच आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात. असे न केल्यास आपणास त्याचा त्रास सहन करावा लागेल व आपले कामात लक्ष लागणार नाही असे ह्या वर्षाचे ग्रहमान सूचित करत आहे. ह्या वर्षी स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी खरेदी करण्यात सुद्धा यश प्राप्तीची शक्यता आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना सुद्धा उत्तम लाभ होईल असे दिसत आहे.
    Yearly Horoscope 2023
    तूळ राशी
  8. वृश्चिक राशी : २०२३ चे वर्ष आपल्यासाठी बहुतांशी अनुकूलता घेऊन येणारा आहे. आपला आत्मविश्वास उंचावून ह्या वर्षी नवीन काहीतरी करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. ह्या वर्षात आपणास २ गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणे, अन्यथा महत्वाच्या कामात खोळंबा होऊ शकतो. दुसरे म्हणजे आपल्या मनातील भावना लोकां समोर जास्त प्रमाणात व्यक्त न करणे, अन्यथा ते आपल्या भावनांचा गैरफायदा घेण्याची संभावना आहे. ह्या वर्षी आपले विरोधक काही प्रमाणात आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, व त्यामुळे आपण मानसिक तणावात राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी ते आपल्या विरुद्ध काही करू शकणार नाहीत व अंतिम विजय आपलाच असल्याने आपणास घाबरण्याची आवश्यकता नाही. कोर्ट - कचेरीशी संबंधित कार्यात आपणास यश प्राप्त होईल. आपणास नोकरीत चांगली स्थिती प्राप्त होईल. आपल्या आर्थिक स्थितीवर ताण येऊ नये म्हणून आपणास वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या वर्षी प्रकृतीत चढ - उतार येतील. अनेकदा घरगुती उपचाराने सुद्धा आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. अचानकपणे एखादी शारीरिक व्याधी निर्माण होईल, तसेच ती दूर सुद्धा होईल. त्यामुळे आपण काहीसे त्रासून जाल. असे असले तरी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष न करता आहारावर लक्ष द्यावे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या आशीर्वादाने आपली प्रलंबित कामे होतील. त्यामुळे आर्थिक लाभासह समाजात सुद्धा आपली प्रतिष्ठा उंचावेल. भविष्यात आपल्यासाठी उपयुक्त ठरतील असे दूरवरचे प्रवास सुद्धा ह्या वर्षी आपण कराल. ह्या वर्षी एखादा विदेश प्रवास सुद्धा संभवतो. जमीन - जुमल्याशी संबंधित कामात आपणास यश प्राप्त होईल. आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर खूप काही करू शकाल. असे असले तरी महत्वाच्या कामात आपला खोळंबा होण्याची संभावना असल्याने सध्या आपणास आळस झटकावा लागेल. आपले मन धार्मिक प्रवृत्तीत गुंतल्याने आपणास मानसिक शांतता जाणवेल. घरात एखादे शुभ कार्य झाल्याने कौटुंबिक वातावरण धार्मिक व शांततेने युक्त राहील. आपल्या मनात नवीन काही शिकण्याची इच्छा जागृत होऊन नवीन विषय शिकण्याचा विचार आपण करण्याची शक्यता आहे. त्याने आपणास निव्वळ आनंदच मिळेल असे नव्हे तर आपले ज्ञान सुद्धा विकसित होईल. काही नवीन व त्यांच्या क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आपण याल. अशा व्यक्तींच्या भेटीने आपण आनंदित व्हाल व आपणास जीवनात प्रगती करण्याची संधी सुद्धा प्राप्त होईल.
    Yearly Horoscope 2023
    वृश्चिक राशी
  9. धनु राशी :आपल्यासाठी २०२३ चे वर्ष अनुकूलता घेऊन येणारे आहे. जीवनातील अनेक क्षेत्रात आपण यशस्वी व्हाल व त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल. ह्यामुळे आपला अहंकार वाढणार नाही ह्याची खबरदारी मात्र आपणास घ्यावी लागेल. आपली कामे योग्य प्रकारे करावीत. असे केल्यानेच आपण इतर क्षेत्रात प्रतिष्ठा व पैसा मिळवू शकाल. काही कारणास्तव आपणास एखादा पुरस्कार सुद्धा मिळू शकतो. धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीत सहभागी होऊन आपण सामाजिक कार्यात सुद्धा स्वारस्य दाखवाल. ह्या वर्षात दानधर्म व लोकांना मदत करून सुद्धा आपण आनंदित व्हाल. असे झाल्याने आपल्या मनात लोकांची निःस्वार्थ सेवा करण्याची भावना वृद्धिंगत होऊन आपण अत्यंत खुश असल्याचे दिसून येईल. ह्या वर्षी आपण सामान्य प्रवासच कराल, ह्याचाच अर्थ प्रवासाची शक्यता ह्या वर्षात नगण्य आहे. त्यामुळे आपल्या खर्चात सुद्धा कपात होईल व वर्षाच्या अखेरीस आपली बँकेतील गंगाजळी मजबूत राखण्यात आपण यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवन आनंदित राहील. कुटुंबातील वयोवृद्धांचे आशीर्वाद आपणास प्रत्येक कामात मदतरूप होतील. वर्षाच्या मध्यास आपणास दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. आपल्यापैकी ज्या व्यक्ती एखादा व्यवसाय करत आहेत, ते प्रवासातून चांगला फायदा मिळवू शकतील. ह्या वर्षी आपणास भावंडांचे विशेष सहकार्य मिळाल्याने आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गरज भासल्यास ते आपणास आर्थिक मदत सुद्धा करतील. त्यामुळे आपले संबंध अधिक दृढ होऊन आपली आर्थिक आव्हाने सुद्धा कमी होतील. ह्या वर्षी आपण उत्तम मनोबलांसह आपली कामे करताना दिसून येईल. व्यापारात सुद्धा थोडी जोखीम पत्करून आपल्या कामात आपण प्रगती कराल. आपल्या संततीच्या बाबतीत हे वर्ष चढ - उतारांचे आहे. त्यांना आरोग्य विषयक त्रास संभवतो. त्यांची संगत सुद्धा चुकीची असू शकते. त्यामुळे ह्या दोन्ही आघाडींवर त्यांच्याकडे आपणास लक्ष ठेवावे लागेल. चुकीच्या संगतीचा परिणाम त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण करण्याची संभावना आहे. जर ते प्रौढ असतील तर त्यांच्या कारकिर्दीसाठी हे वर्ष अनुकूलता घेऊन येणारे आहे. ह्या वर्षात आपणास प्रकृतीवर होणाऱ्या चढ - उतारांना सामोरे जावे लागणार असल्याने त्याकडे आपण लक्ष द्यावे. आपल्या वक्तव्यात स्पष्टपणा जाणवेल, ज्यात कटुता सुद्धा असेल. त्यामुळे आपलीच काही माणसे आपल्यावर क्रोधीत होण्याची शक्यता आहे. नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्यावरच त्यांची समजूत काढण्याची जवाबदारी असेल.
    Yearly Horoscope 2023
    धनु राशी
  10. मकर राशी : आपल्या बाबतीत एक समज आहे कि आपण फक्त स्वतःच्या बाबतीतच विचार करता व काहीसे स्वार्थी असता. काही अंशी हे खरे सुद्धा आहे, परंतु जेव्हा आपण समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा विचार करता तेव्हा त्यात बरेच काही बदलून टाकता. ह्या वर्षी सुद्धा आपल्या बरोबर असेच काही होणार आहे. आपल्या मनात काही ज्वलंत विषय असतील, ज्यामुळे आपण राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवून त्यात यशस्वी सुद्धा होऊ शकता. ह्या वर्षी आपणास प्रवासा संबंधी विशेष विचार करावा लागणार नाही. बहुतांश वेळी आपणास घरा बाहेर राहूनच यश प्राप्ती होऊ शकते. आपण जर घरात राहत असाल तर कदाचित काम करताना सुद्धा इतर प्रवृत्तींमुळे आपणास कुटुंबियां पासून दूर राहावे लागेल. परंतु, ह्यात सुद्धा आपणास फायदाच होईल. वर्षाच्या सुरवातीस परदेश गमनाची संधी मिळेल, तेव्हा प्रयत्न करा व वेळेचा दुरुपयोग टाळा. मनात धार्मिक विचारांची वृद्धी होईल, जी आपणास योग्य मार्गावर घेऊन जाईल व आपल्या हातून कोणतेही चुकीचे कृत्य होऊ देणार नाही. त्यामुळे समाजात सुद्धा आपली पत - प्रतिष्ठा वाढेल व आपल्याकडे आदराने बघितले जाईल. भावंडांच्या बाबतीत आपण जागरूक राहाल व त्यांच्या सल्ल्यानुसार आपण एखादे मोठे पाऊल उचलाल. ह्या वर्षी आपणास विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात बहर येण्यासाठी आपणास कष्ट घ्यावेच लागतील. फेब्रुवारी व मार्च दरम्यान आपण एखादी महागडी वस्तू किंवा मोबाइल खरेदी करू शकाल. हि वस्तू अशी असेल कि जी अनेक वर्षां पासून खरेदी करण्याची आपली इच्छा असेल. माता - पित्यांशी काही मतभेद संभवतात, जे टाळण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. आपणास परदेशातून एखादी चांगली बातमी मिळण्याची संभावना आहे. कुटुंबात एखादे शुभ कार्य, पूजा इत्यादी होण्याची शक्यता आहे. विशेषतः सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान घरात एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. प्रकृतीत चढ - उतार आले तरी कोणतेही मोठे दुखणे येणार नाही. आरोग्य विषयक लहान - सहान तक्रारी तर उदभवू शकतात. आपल्या मनात भौतिक सुखाची इच्छा तर होईलच, परंतु अनेकदा आपला व्यवहार संन्यासास शोभेल असा असेल. त्यामुळे आपले मन गर्दीत रमणार नाही. तेव्हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा, जेणे करून गोष्टी पुढे जाऊन आपले नुकसान होणार नाही. ह्या वर्षी वडिलांशी असलेल्या संबंधात काही तणाव निर्माण होऊ शकतो, तेव्हा काळजी घ्यावी.
    Yearly Horoscope 2023
    मकर राशी
  11. कुंभ राशी : २०२३ चे चर्ष आपल्यासाठी खुशखबर घेऊन येणारे आहे, परंतु ह्या वर्षी आपणास सर्वात अधिक लक्ष आपल्या प्रकृतीवर द्यावे लागेल. आपण जर प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर ती बिघडण्याची संभावना आहे. त्यामुळे आपणास रुग्णालयाचे तोंड सुद्धा बघावे लागण्याची शक्यता आहे. सध्या आपणास आपल्या प्राप्तीत खूप मोठी वाढ होत असल्याचे दिसून येईल, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. आपण जर नोकरी करत असाल तर आपली पगारवाढ होऊ शकते. आपण जर व्यापार करत असाल तर आपला नफा वाढेल. सरकारी क्षेत्राच्या एखाद्या चांगल्या योजनेचा लाभ घेऊन सुद्धा आपण चांगली आर्थिक प्राप्ती करू शकता. वर्षाच्या सुरवातीस कौटुंबिक जीवन तणावग्रस्त राहिले तरी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान त्यात सुधारणा होईल. कुटुंबातील वयोवृद्धांचा पाठिंबा मिळून आपण आपल्या कामात उत्तम यश संपादन करू शकाल. वर्षाच्या सुरवातीस भावंडांशी मतभेद होण्याची संभावना असली तरी ते शक्य तितकी मदत आपणास करतील व त्यामुळे आपले प्रेम उफाळून येईल. असे झाल्यामुळे आपल्या नात्यात गोडवा निर्माण होईल. ह्या वर्षी एखादा मित्र आपणास दगा देण्याची संभावना असल्याने मित्रां पासून जरा जपून राहावे. वडील भावंडांशी सलोखा राहील. आपण जर परदेशात जाण्यास इच्छूक असाल तर ह्या वर्षी आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल व आपणास परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी आपले लक्ष वेधून घेतील व आपल्या हाती एखादी मोठी संपत्ती सुद्धा लागू शकेल. ह्या वर्षी आपण अनेक धार्मिक प्रवास कराल. तीर्थस्थानांची भेट घेऊन व देव दर्शन घडून आपणास मानसिक शांती सुद्धा प्राप्त होईल. आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल, परंतु इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे टाळावे. ह्या वर्षी आपणास लोकप्रियता सुद्धा मिळेल.
    Yearly Horoscope 2023
    कुंभ राशी
  12. मीन राशी : आपण भावनाप्रधान होण्या बरोबरच बुद्धिमान सुद्धा असता. ह्या वर्षी आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असाल तेथे आपल्या बुद्धी व ज्ञानाच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल, त्यासाठी आपली बुद्धिमत्ता कामी येईल. ह्या वर्षी आपणास सरासरीपेक्षा जास्त यश मिळू शकेल. प्राप्तीच्या दृष्टिकोनातून बघितल्यास आपण आर्थिक दृष्ट्या उत्तम स्थितीत असाल व आपल्या बँकेतील गंगाजळीत वाढ झालेली असेल. ह्या वर्षी आपण गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी प्रवास कराल. आपणास आपल्या भावंडांचा पाठिंबा मिळेल, परंतु त्यांच्याशी संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. आपली भावंडे हेच आपले प्रमुख बलस्थान आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आपणास कुटुंबातील वयोवृद्धांचे सुद्धा सहकार्य मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या कार्यात यश संपादन करू शकाल. आपल्या कृत्याने ते दुखावले जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी, अन्यथा त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या कामगिरीवर व प्रकृतीवर होऊन आपणास नुकसान सोसावे लागू शकते. आपण जर परदेशात वास्तव्यास असाल तर ह्या वर्षी आपणास स्वदेशी येण्याची संधी मिळू शकते. पैसे कमावण्यासह कुटुंबियांसाठी वेळ काढण्याची सुद्धा गरज असेल. पैसे कमावण्यासाठी आपण कुटुंबा पासून दूर राहू शकता, तरी सुद्धा कुटुंबीयांचा विचार करावा. वैवाहिक जोडीदारामूळे आपणास आपल्या व्यापारात चांगला लाभ होऊ शकतो. आपण जर नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर तो वैवाहिक जोडीदाराच्या साथीने किंवा त्यांच्या नांवाने केल्यास जास्त लाभदायी होईल. आपला आत्मविश्वास उत्तम असेल. आपण आपले ज्ञान व बुद्धी ह्यांच्या जोरावर जवळ जवळ सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. त्यासाठी हे वर्ष आपणास खूपच अनुकूल असेल. आपले वय काहीही असो, परंतु आपणास जर काही शिकावयाचे असेल तर ह्या वर्षी आपणास त्यात चांगले यश प्राप्त होऊ शकेल. आपण निव्वळ उत्तम शिक्षणच घेणार नाहीत तर त्यास एक व्यवसाय म्हणून सुद्धा स्वीकारू शकाल. आपणास आध्यात्मिक प्रवृत्तीत आनंद प्राप्त होईल व अशा कार्यात आपण सहभागी सुद्धा व्हाल. आपणास आपल्या चांगल्या संवयी व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन एखाद्या मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. तेथे आपणास सन्मानित किंवा पुरस्कृत करण्यात येऊ शकते. ह्या वर्षी आपणास शिक्षण क्षेत्रात भरघोस यश मिळू शकते. वर्षाच्या मध्यास कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. एखादी धार्मिक यात्रा संभवते. धार्मिक यात्रा करून आपणास मानसिक शांतता लाभेल. जर स्वतःवर विश्वास ठेवलात तर अनेक कार्यात आपण यशस्वी होऊ शकाल. Yearly Horoscope 2023 . Zodiac Signs Prediction . Impact And Remedies . Shani . Rahu . Ketu . Mercury . Transit . Yearly Rashi Fortune 2023 Marathi . Happy New Year 2023 . Yearly Horoscope 2023 In Marathi
    Yearly Horoscope 2023
    मीन राशी

Last Updated : Jan 1, 2023, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.