ETV Bharat / bharat

मुलांना भेटवस्तू देणारे 'सांताक्लॉज' आहेत तरी कोण? जाणून घ्या इतिहास आणि कारण - Santa Claus

Christmas Day २०२३ : ख्रिसमस (नाताळ) हा सण येशू ख्रिस्तांच्या जन्माशी जोडलेला आहे. ख्रिश्चन धर्मानुसार, येशू ख्रिस्तांचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. म्हणून या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. मात्र, मुलांना भेटवस्तू देणारे 'सांताक्लॉज' कोण? आहेत, याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Christmas Day
Christmas Day
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 11:05 PM IST

हैदराबाद Christmas Day २०२३ : जोसेफ तसंच मेरी यांचा मुलगा येशू यांना ख्रिश्चन धर्मात सर्वोच्च स्थान आहे. 25 डिसेंबर हा प्रभु येशू यांचा जन्मदिवस आहे. दरवर्षी त्यांची जयंती ख्रिसमस (नाताळ) म्हणून साजरी केली जाते. या प्रसंगी भारतासह जगातील बहुतेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. तज्ज्ञांच्या मते, नाताळ हा सण दोन हजार वर्षांहून अधिक काळापासून साजरा केला जातो. त्यामुळं ख्रिसमसशी संबंधित अनेक परंपरा, प्रथा आहेत. ख्रिसमसचा इतिहास, सांताक्लॉज कोण होते? त्या नावाची व्यक्ती होती का? तसंच सांताक्लॉजच्या माध्यमातून भेटवस्तू देण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली? हे जाणून घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे.

सांताक्लॉजची खरी उत्पत्तीस,आख्यायिका : ख्रिसमस सण आज (25 डिसेंबर) रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. बरेच लोक ख्रिसमसची आतुरतेनं वाट पाहत असतात. ख्रिसमस सण लहान मुलांचा आवडता सण आहे. हा सण त्यांच्यासाठी आनंद घेऊन येतो. जेव्हा, जेव्हा ख्रिसमसचा उल्लेख केला जातो, तेव्हा सांताक्लॉजबद्दल चर्चा नक्कीच होते. लहान मुलं त्यांना भेटवस्तू देण्यासाठी सांता येण्याची वर्षभर वाट पाहत असतात.

ख्रिसमसचा इतिहास : ख्रिसमसचा इतिहास प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माशी जोडलेला आहे. ख्रिश्चन धर्मानुसार, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. त्यामुळं याच दिवशी ख्रिसमस (नाताळ) सण साजरा केला जातो. परंतु, काही जाणकारांच्या मते, या दिवशी प्रभू येशूचा जन्म झाला नव्हता, तो त्यांचा केवळ प्रतीकात्मक वाढदिवस आहे. बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही, परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. जोसेफ तसंच मेरी यांच्या पोटी येशूचा जन्म झाला होता. मेरीला एक स्वप्न पडले होतं. ज्यामध्ये तिनं प्रभुचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती, असा दावा त्यांचे अनुयायी करतात. रोमन ख्रिश्चन इतिहासकार सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनस यांच्या मते, आईनं केलेल्या भविष्यवाणीनंतर प्रभु येशू बरोबर 9 महिन्यांनंतर 25 डिसेंबर रोजी पृथ्वीवर जन्माला आले. त्यामुळं 25 डिसेंबर हा ख्रिसमस 'डे' म्हणून ओळखला जातो.

कोण आहे सांताक्लॉज ? : सांताक्लॉजला यांना संत निकोलस, क्रिस क्रिंगल, फादर ख्रिसमस अशा विविध नावांनी ओळखलं जातं. त्यांचा जन्म 280 च्या सुमारास तुर्कीमध्ये झाला होता. संत निकोलस हे चौथ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू भक्तांना भेटवस्तू देत असे. सांताक्लॉजची आधुनिक संकल्पना त्याच्यापासूनच निर्माण झाली असावी, असं मानलं जातं. ते सुरुवातीला ख्रिश्चन चर्चमध्ये बिशप होते. त्यांचा छळ करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. सेंट निकोलस यांनी त्यांची सर्व वारसाहक्क संपत्ती दान केली होती. याशिवाय आपल्या कमाईतून ते ग्रामीण भागात फिरून गरीब, आजारी लोकांना मदत करत असे. संत निकोलस यांची मुलांचे आणि खलाशांचे रक्षक म्हणून देखील ओळख आहे. त्यामुळं सेंट निकोलस 'डे' त्यांच्या सन्मानार्थ 6 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश, डच संस्कृतींमध्ये उदयास आलेली "सांता क्लॉज" ही संकल्पनाही तिथूनच उद्भवली असावी असं इतिहासकारांचं मत आहे.

हेही वाचा -

  1. माझा कुस्तीशी आता काहीही संबंध नाही, संजय सिंह माझे नातेवाईक नाहीत - ब्रिजभूषण शरण सिंह
  2. 'त्या' डॉक्टर महिलेसोबतचे फोटो दाखवायचे का? नितेश राणेंचा संजय राऊतांबाबत मोठा खुलासा
  3. हॉटेल रमाडामध्ये परवानाशिवाय नवीन वर्षाचे गाणे वाजणार नाही, उच्च न्यायालयाचा लाल दिवा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.