हैदराबाद - हज यात्रेसाठी एक व्यक्ती सायकलवरून निघाली आहे. तो व्यक्ती अफगाणिस्तानचा आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. आता त्याला मदतीचा प्रस्ताव दिला जात आहे. मात्र, स्वत:च्या संसाधनांचाच वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-
A man from Afghanistan 🇦🇫 is currently enroute to Makkah for #Hajj on a bicycle! pic.twitter.com/RW3yj39f7X
— Haramain Sharifain (@hsharifain) June 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A man from Afghanistan 🇦🇫 is currently enroute to Makkah for #Hajj on a bicycle! pic.twitter.com/RW3yj39f7X
— Haramain Sharifain (@hsharifain) June 8, 2022A man from Afghanistan 🇦🇫 is currently enroute to Makkah for #Hajj on a bicycle! pic.twitter.com/RW3yj39f7X
— Haramain Sharifain (@hsharifain) June 8, 2022
प्रत्येक मुस्लिमाला आयुष्यात एकदा तरी हज करण्याची इच्छा असते. पण तिथे कसे पोहोचायचे ते त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांवर अवलंबून असते. अफगाणिस्तानातील एक व्यक्ती आपल्या सायकलवरून हज यात्रेसाठी निघाला आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीने ही माहिती देताच लोकांनी त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली. आता तोही प्रेरणास्थान बनला आहे.
नूर अहमद असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो अफगाणिस्तानचा आहे. त्याचा सायकलवरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता अफगाण सरकारने नूरला हवाई तिकीट देऊ केले आहे. मात्र, नूरने ही ऑफर नाकारली आहे.
सायकलवरून प्रवास पूर्ण करणार असल्याचे नूरने सांगितले. आपण कोणाचीही मदत मागत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याला वरील व्यक्तीला खूश करायचे आहे, म्हणून तो त्याच्याकडे जे काही साधन असेल त्याचा वापर करणार आहे.
हेही वाचा - Sonia Gandhi In Hospital: सोनीया गांधी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल