तेहरान - इराण : हदीस नजाफी, एक इराणी तरुणी, जी अमिनीच्या मृत्यूविरोधात सुरू असलेल्या ( HADIS NAJAFI PROTEST AGAINST HIJAB ) आंदोलनादरम्यान केस बांधत असतानाच्या व्हिडिओ मुळे व्हायरल झाली. तिची इराणी पोलीस कर्मचा-यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. आता हदीस नजाफी हिच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात लोक तिच्या थडग्यावर फोटो ठेवून रडताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार हदीस हिला सहा गोळ्या लागल्या होत्या. (IRAN POLICE SHOT DEAD BY 6 ROUND FIRING) गोळ्या तिच्या पोटात, मानेवर, हृदयात आणि हाताला लागल्या होत्या.
-
This is the funeral of 20 year old #HadisNajafi, who was shot dead on the streets by security forces for protesting yhe murder of #MahsaAmini by Hijab Police.
— Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) September 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Hadis was a kind hearted girl and loved dancing. pic.twitter.com/tduxVe1SZf
">This is the funeral of 20 year old #HadisNajafi, who was shot dead on the streets by security forces for protesting yhe murder of #MahsaAmini by Hijab Police.
— Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) September 25, 2022
Hadis was a kind hearted girl and loved dancing. pic.twitter.com/tduxVe1SZfThis is the funeral of 20 year old #HadisNajafi, who was shot dead on the streets by security forces for protesting yhe murder of #MahsaAmini by Hijab Police.
— Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) September 25, 2022
Hadis was a kind hearted girl and loved dancing. pic.twitter.com/tduxVe1SZf
21 सप्टेंबर रोजी तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सुरक्षा दलांनी तीची हत्या केल्यानंतर तिला घेम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथंच तिचा मृत्यू झाला. हदीसच्या बहिणीने सांगितले की, ती फक्त २० वर्षांची होती. मेहसा अमिनीच्या मृत्युनंतर तिला अतिशय दु:ख झाले होते. ती म्हणाली होती की ती आता गप्प बसू शकत नाही. पत्रकार आणि महिला हक्क कार्यकर्ते मसीह अलीनेजद यांनी २५ सप्टेंबर रोजी हदीसच्या मृत्यूची पुष्टी केली. तिने हदीसचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सज्ज होताना दिसत होती.
ही 20 वर्षीय तरुणी मेहसा अमिनीच्या हत्येविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी सज्ज होत असल्याचे अलिनेजदने ट्विट केले. इस्लामिक रिपब्लिकच्या सुरक्षा दलांनी तिच्या छाती, चेहरा आणि मानेवर गोळी झाडली. या व्हिडिओमध्ये ती निषेधात सामील होण्यासाठी आपले केस बांधताना दिसत आहे. हदीसचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इराणमध्ये सध्या या सक्तीच्या हिजाब विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या निदर्शनात आतापर्यंत ५७ जणांचा बळी गेला आहे. या निदर्शनात मृत्युमुखी पडलेली २० वर्षीय हदीस नजाफी ही इराणच्या सुरक्षा दलांचा ताजा बळी ठरली आहे.