जयपूर (राजस्थान): राजस्थानमध्ये H3N2 इन्फ्लूएंझाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटल आणि एसएमएस मेडिकल कॉलेजसह इतर सरकारी हॉस्पिटलमध्ये थंडीतापामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि एसएमएस मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची 54 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत, परंतु दररोज केवळ 15 ते 20 लोकांचे नमुने घेतले जात आहेत.
दीर्घकाळ खोकल्याची आहे तक्रार: तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, ओपीडीमध्ये येणारा प्रत्येक तिसरा-चौथा रुग्ण हा विषाणू किंवा त्याच्याशी संबंधित लक्षणांनी ग्रस्त आहे. नाक बंद होणे, सर्दी, घसादुखी, ताप अशा तक्रारी घेऊन रूग्ण रूग्णालयात पोहोचत असल्याचे एसएमएस हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. पुनित सक्सेना यांनी सांगितले. ते म्हणाले की H3N2 इन्फ्लूएंझा असलेल्या रुग्णांना जास्त तापानंतर दीर्घकाळ खोकल्याची तक्रार असते. त्यांनी सांगितले की बहुतेक सौम्य केसेस आता येत आहेत.
फ्लू श्रेणीचे विषाणू: डॉक्टरांच्या मते, हा विषाणू फ्लू श्रेणीचा आहे. हवामानातील बदलाबरोबरच याच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. यामध्ये साधारणतः 3 ते 4 दिवस ताप राहतो, परंतु काही प्रकरणांमध्ये 6 ते 7 दिवसातही ताप बरा होत नाही. या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांमध्ये ताप आल्यावर खोकला सुरू होतो आणि तो बराच काळ टिकतो. काही प्रकरणांमध्ये न्यूमोनिया होण्याचीही स्थिती निर्माण होत आहे. देशातील अनेक भागांमध्ये या नवीन विषाणूचे रुग्ण वाढतच चालले आहेत. एच३एन२ विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणा राज्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
खबरदारी घेतल्यास होईल बचाव: राज्यातील रुग्णालयांमध्ये या विषाणूची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत तपास होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. एसएमएस हॉस्पिटलमध्ये दररोज केवळ 15 ते 20 रुग्णांचे नमुने घेण्यात येत आहेत. एसएमएस मेडिकल कॉलेजच्या मते, फेब्रुवारीपासून H3N2 इन्फ्लूएंझाची 54 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. खबरदारी घेतल्यास या विषाणूपासून वाचवता येईल, असे एसएमएस हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. पुनित सक्सेना यांनी सांगितले.
हेही वाचा: पंतप्रधान मोदींचा एकच नारा तुम्ही मला ड्रग्ज द्या मी तुम्हाला गहू देतो