ETV Bharat / bharat

मध्य प्रदेश हादरलं! बाप-मुलानं खून करत मृतदेहाचे केले 400 तुकडे - स्वर्ण रेखा नाल्यात फेकले

Gwalior Murder Case : ग्वाल्हेरमध्ये 57 दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला होता. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेलं. तिथं दोघांनीही मृतदेह फेकल्याची कबुली दिली. आरोपींनी तरुणाचे 400 तुकडे केले होते.

Gwalior Murder Case
Gwalior Murder Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 7:47 AM IST

Updated : Nov 29, 2023, 8:09 AM IST

तरुणाची हत्या करुन मृतदेहाचे केले 400 तुकडे

ग्वाल्हेर Gwalior Murder Case : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका तरुणाची हत्या करुन तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे एक-दोन नव्हे तर तब्बल 400 तुकडे करुन शहराच्या विविध भागात फेकून दिले. पोलिसांनी या हत्येप्रकरणी आरोपी पिता-पुत्राला अटक केली होती. आता याप्रकरणी पोलिसांनी शहरातील ज्या नाल्याजवळ मृताचे तुकडे फेकले होते. तिथे नेऊन त्यांची चौकशी केलीय. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर पोलीस या पिता-पुत्राचा शोध घेत होते. तब्बल 57 दिवसांनी या हत्येचं गूढ उकललंय.

28 सप्टेंबरला सापडला मृतदेह : ग्वाल्हेरमधील जनकगंज पोलिस स्टेशन हद्दीतील रामकुई गेंदावली रोडवर असलेल्या स्वर्ण रेखा नाल्यात 28 सप्टेंबरला एका व्यक्तीचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला होता. तसंच विच्छेदन केलेलं धडही या नाल्यात सापडले होते. तपासादरम्यान हा मृतदेह त्याच शहरातील बहोदपूर झाडू मोहल्ला येथील रहिवासी राजू खानचा असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून तपास सुरू केला होता. राजू खानच्या कुटुंबीयांनी तस्कर कल्लू खान आणि मुलगा नाझिम यांच्यावर हत्येचा आरोप केला होता.

वडील न्यायालयात हजर, मुलाला आग्र्यातून अटक : दोन्ही आरोपींना याची माहिती मिळताच ते पसार झाले. यानंतर पोलिसांनी सातत्यानं कारवाई करून दोघांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, पोलिसांपासून वाचण्यासाठी वडील कल्लू खान हे अंमली पदार्थांच्या व्यसनप्रकरणी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी कारागृहात झाली असताना मुलगा अद्याप पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता. यानंतर काही दिवसांनी कल्लू खानचा मुलगा नाझिम याला आग्रा इथून अटक करण्यात आली. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

डंबेलनं वार करुन हत्या : चौकशीदरम्यान आरोपी पिता-पुत्रांनी सांगितलं की, कल्लू खान आणि नाझिमचं राजूसोबत भांडण झालं होतं. वाद इतका वाढला होता की तो पोलिसांपर्यंत पोहोचला होता. याच प्रकरणात 21 सप्टेंबर रोजी कल्लू खान यानं राजूला तक्रार मागं घेण्यासाठी घरी बोलावलं. तिथे राजूनं त्याबदल्यात 20 हजार रुपये मागितले. त्यानंतर पैसे देण्याचं सांगून राजूसह दोघंही सत्यनारायण यांच्या घरी पोहोचले. पैशाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर खोलीत ठेवलेल्या डंबेलनं राजूच्या डोक्यात वार करून खून केला. दोन्ही आरोपींनी राजूच्या डोक्यात सुमारे दोन ते तीन वार केले. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला.

  • मृतदेहाचे 400 तुकडे : आरोपींनी राजूच्या मृतदेहाचे 400 तुकडे केले. त्यानंतर ते 15 थैल्यात भरुन स्वर्ण रेखा नाल्यात फेकले. पोलिसांनी कल्लू खानच्या घरातून गुन्ह्यात वापरलेला डंबेलही जप्त केलाय. कल्लूलाही वेगळ्या रिमांडवर घेण्यात येणार असून नाझीमच्या जबाबाची पडताळणी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. कल्लूच्या गुन्हेगारी रेकॉर्डचाही उल्लेख करण्यात आलाय. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, एका प्रकरणात तो स्वत: तुरुंगात होता. मुलाच्या अटकेनंतर हा प्रकार उघडकीस आलाय.

हेही वाचा :

  1. शिक्षक पत्नी अन् मुलाची हत्या करून शिक्षक पतीची आत्महत्या
  2. ७ महिने, १४ खून...एकच पॅटर्न! ४० ते ७० वर्षे वयोगटातील महिला निशाण्यावर; सिरियल किलिंगच्या घटनांनी दहशत
  3. लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या महिलेचे केले ३१ तुकडे! जोडप्याला अटक

Last Updated : Nov 29, 2023, 8:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.