ETV Bharat / bharat

मॉडेल पाहुजा हत्याकांडातील आरोपी गिलला अटक, विदेशात पळून जाण्याची केली होती तयारी

Model Divya Pahuja Murder Case : गुरुग्राममधील प्रसिद्ध मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी फरार आरोपी बलराज गिल याला कोलकाता येथून अटक केली आहे. दिव्या पाहुजा हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. तसंच आरोपींची माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलं होतं.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 9:55 AM IST

Model Divya Pahuja Murder Case
Model Divya Pahuja Murder Case

गुरुग्राम Model Divya Pahuja Murder Case : हरियाणाच्या गुरुग्राममधील मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालंय. या खून प्रकरणातील 9 दिवसांपासून फरार असलेला आरोपी बलराज गिल याला पोलिसांनी अटक केलीय. बलराज गिलला पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळावरुन अटक करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, बलराज गिल विदेशात पळून जाण्याचा विचार करत होता.

दिव्या पाहुजा हत्येप्रकरणी आरोपी बलराज गिलला अटक : 9 दिवसांपूर्वी घडलेल्या मॉडेल दिव्या पाहुजा खून प्रकरणात मुख्य आरोपी अभिजीतनं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बलराज गिल आणि रवी बंगा यांची मदत घेतली होती. बलराज गिल हा मुख्य आरोपी अभिजीतचा मित्र असून तो खून केल्यानंतर दिव्याचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये टाकून पळून गेला होता. यानंतर पोलिसांनी पटियाला बसस्थानकाजवळून बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती. मात्र दिव्या पाहुजाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. दिव्या पाहुजाचा मृतदेह शोधण्यासाठी गुरुग्राम पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

  • लवकरच मृतदेह मिळू शकतो : गुरुग्रामचे एसीपी वरुण दहिया म्हणाले की, "बलराज गिलच्या अटकेमुळं लवकरच गुरुग्राम पोलीस दिव्या पाहुजाचा मृतदेहही जप्त करतील अशी अपेक्षा आहे." मात्र, या खून प्रकरणातील आणखी एक आरोपी रवी बंगा हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
  • पश्चिम बंगाल विमानतळावरुन अटक : बलराज गिलला गुन्हे शाखेनं पश्चिम बंगालमधून अटक केलीय. बलराज गिलला कोलकाता येथून अटक करण्यात आलीय. त्याला गुरुग्रामला आणण्यात येत आहे. त्यानंतर पुढील चौकशी केली जाईल. बलराज गिलच्या अटकेने या खून प्रकरणाचं गुढ लवकरच उकलतील, असं गुरुग्रामचे एसीपी वरुण दहिया यांनी सांगितलंय.

पोलिसांनी ठेवलं होतं 50 हजारांचं बक्षीस : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बलराज गिल आणि रवी बंगा यांना अटक करण्यासाठी गेल्या 9 दिवसांपासून गुरुग्राम पोलिसांचं पथक विविध ठिकाणी छापे टाकत होते. बलराज गिल आणि रवी बंगा यांच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. तो विदेशात पळून जाण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर गुरुग्राम पोलिसांनी त्याच्यासाठी एक दिवस आधी लूक आउट नोटिस जारी केलं होतं. अखेर पोलिसांच्या पथकानं बलराज गिलला अटक केलीय.

हेही वाचा :

  1. दुसऱ्या धर्मातील तरुणाबरोबर बहिणीचं प्रेमप्रकरण, संतापलेल्या भावानं अल्पवयीन बहिणीची गोळ्या झाडून केली हत्या
  2. मुलीचा खून करून पसार झालेल्या बापाला तीन तासात बेड्या, दारूच्या वादातून झालं होतं भांडण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.