शिखांच्या 10व्या आणि शेवटच्या धर्माचे (10th and last Sikh Guru)श्री गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त (Guru Gobind Singh Jayanti), शीख समुदायातील लोक देश आणि जगात प्रभातफेरी काढतात. गुरुद्वारांमध्ये शब्द कीर्तनाचे आयोजन केले जाते आणि गुरवाणीचे पठण केले जाते. शिखांच्या इतिहासातील महान योद्धा मानल्या जाणार्या गुरु गोविंद सिंग यांच्या शौर्याच्या कहाण्या आजही लोकांना आठवतात. गुरु गोविंद सिंग यांना अध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ म्हणूनही ओळखले जातात. या महान आध्यात्मिक गुरुचा जन्म पाटणा, बिहार येथे वडील गुरु तेग बहादूर आणि माता गुजरी यांच्या पोटी झाला. गुरु गोविंद सिंग यांना अजित सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेह सिंग असे चार पुत्र होते.
तारीख आणि वेळ : लोक श्री गुरु गोविंद सिंग (Shree Guru Gobind Singh) यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. या दिवशी घरात उत्तम जेवण बनवले जाते, लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि गुरुद्वारामध्ये कीर्तनाचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व गुरुद्वारांमध्ये लंगरची व्यवस्था असते. गुरु गोविंद सिंह यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी पाटणा साहिब येथे पौष शुक्ल सप्तमीला झाला होता असे मानले जाते. पण इंग्रजी कॅलेंडर, पंचांग तिथी आणि नानकशाही कॅलेंडरमध्ये तारखा वेगळ्या सांगितल्या आहेत. म्हणून 'पौष शुक्ल सप्तमी' हा गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पंचांगानुसार, या वर्षी पौष शुक्ल सप्तमी 29 डिसेंबर 2022 रोजी आलेली आहे. त्यामुळे यावर्षी 29 डिसेंबर 2022 रोजी गुरु गोविंद सिंग जयंती साजरी केली जाणार आहे.
शीख योद्धा समुदाय खालसाची स्थापना : गुरू गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये शीख योद्धा समुदाय खालसाची (Sikh Warrior Community Khalsa) स्थापना केली आणि पाच सिद्धांत स्थापित (Five Principles of Sikhism) केले. या सिद्धांतांना शीख धर्मात अत्यंत महत्त्व आहे. गुरु गोविंद सिंग यांनी सांगितलेल्या तत्त्वांमध्ये पाच ‘क’चा समावेश आहे. यामध्ये केश (न कापलेले केस), कांघा (लाकडी कंगवा), कारा (लोखंडी किंवा स्टीलचे हातात घालायचे कडे), कृपाण (तलवार किंवा खंजीर) आणि कचेरा (लहान अंडरपॅंट) यांचा समावेश आहे.