चंदीगढ : तीन हायप्रोफाईल ड्रग तस्करांना अटक करण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान या तिन्ही तस्करांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 72 किलो 500 ग्रॅम हेरॉईन जप्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ हायप्रोफाईल ड्रग तस्करांना अटक : पंजाबच्या डीजीपीने ट्विट केले की, गुरुदासपूर पोलिसांनी ७२.५ किलो हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी ३ हायप्रोफाईल ड्रग तस्करांना अटक केली आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की अटक करण्यात आलेले अंमली पदार्थ तस्कर हे पंजाबमध्ये सीमापार आणि आंतरराज्य अमली पदार्थांच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात सामील होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Bhagwant Mann ) पंजाब अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
-
In a crucial breakthrough, #Gurdaspur Police arrests 3 high profile drug smugglers wanted in 72.5 Kg #Heroin seizure case at Nhava Sheva Port, #Mumbai effected jointly by ATS Mumbai & #PunjabPolice on July 22. pic.twitter.com/jGEcT5AJ9j
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) November 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In a crucial breakthrough, #Gurdaspur Police arrests 3 high profile drug smugglers wanted in 72.5 Kg #Heroin seizure case at Nhava Sheva Port, #Mumbai effected jointly by ATS Mumbai & #PunjabPolice on July 22. pic.twitter.com/jGEcT5AJ9j
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) November 3, 2022In a crucial breakthrough, #Gurdaspur Police arrests 3 high profile drug smugglers wanted in 72.5 Kg #Heroin seizure case at Nhava Sheva Port, #Mumbai effected jointly by ATS Mumbai & #PunjabPolice on July 22. pic.twitter.com/jGEcT5AJ9j
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) November 3, 2022
आरोपींना अटक : मिळालेल्या माहितीनुसार, पंडोरी गुरदासपूर गावातील गुरसेवक सिंग, गाव मावा येथील मनजीत सिंग आणि पांडोरी पोलीस स्टेशन लोपोके गावातील गुरविंदर सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांना गुरदासपूर सीआयए कर्मचाऱ्यांनी नाकाबंदीदरम्यान केलेल्या तपासणीदरम्यान पकडले आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून 32 बोअर आणि 12 राऊंड जप्त केले आहेत. हे तिघेही अमृतसरहून गुरुदासपूरला थार वाहनावर बसून येत होते.