ETV Bharat / bharat

चित्रकलेतून साकारले संपूर्ण रामायण, गुजरातच्या 17 वर्षीय जान्हवीची कलाकृती

सुरत येथील 17 वर्षीय जान्हवी वेकारियाने 101 फुटाच्या कॅनव्हासवर संपूर्ण रामायण रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. तीच्या या कलेने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.

http://10.10.50.85//gujarat/11-August-2021/gj-sur-ramayan-painting-7300931_07082021144842_0708f_1628327922_785_1108newsroom_1628700125_735.jpg
संपूर्ण रामायण रेखाटणारी जान्हवी वेकारिया फक्त 17 वर्षीची.
author img

By

Published : Aug 12, 2021, 10:30 AM IST

अहमदाबाद - हिंदू धर्माचे अधिष्ठान विविध देवदेवतांत असले तरी ते प्रामुख्याने रामायणात दिसून येते, आणि म्हणूनच रामायण कथा या विविध काळात लिहील्या गेल्या. त्यांना जगतमान्यता पण आहे. हाच प्रयोग शिल्प असो की चित्रकला असो यातूनही अधोरेखित होतो. सुरत येथील 17 वर्षीय जान्हवी वेकारियाने 101 फुटाच्या कॅनव्हासवर संपूर्ण रामायण रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

जान्हवीने गुजरातच्या पारंपारिक कला शैलीमध्ये 101 फूट लांब कॅनव्हासवर रामायण रेखाटले आहे. नववीत शिकत असताना तिने हे चित्र बनवायला सुरुवात केली होती. तिला वेळ मिळाला, की ती चित्रे बनवायला बसायची. जेव्हा ती बारावीत पोहोचली, तेव्हा ही चित्रकला पूर्ण झाली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे खूप वेळ मिळाला. त्यानंतरच हे अद्भुत चित्र पूर्ण करू शकले, असे तीने सांगितले. तीच्या या कलेने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.

जान्हवीने रामायणातील 15 प्रमुख घटनांची निवड केली. त्यात राम जन्मापासून रावणापर्यंतचा समावेश आहे. जन्मानंतर गुरुकुल, स्वयंवर, सीता हरण, लंका दहन हे अतिशय सुंदर चित्रण केले आहे. चित्र रेखाटताना तीने सर्व तपशीलांवर काम केले. म्हणजेच जंगल कसे असावे, राजवाडा कसा दिसला पाहिजे, वनवासात असताना कपडे कसे होते, इत्यादी.

Gujarat : This Surat girl paints entire Ramayana on a 101-foot canvas
राम आणि रावणाचे युद्ध...

लहानपणी टीव्हीवर रामायण मालिका पाहिल्यानंतर तसेच आजी -आजोबांकडून रामायण कथा ऐकल्यानंतर तीला हे चित्र रेखाटण्याची प्रेरणा मिळाली. भगवान राम हे सर्व लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. ते नेहमी सत्यासोबत राहतात आणि लोकांना मदत करतात. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे, असे ती म्हणाली.

जान्हवीच्या चित्रकलेतील रावण...

राम मंदिरामध्ये चित्र प्रदर्शित करण्याची इच्छा -

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरामध्ये तिची चित्रे कायमस्वरूपी प्रदर्शित केली जावीत आणि विशेष प्रदर्शन लावले जावे, जेणेकरून तेथे येणारे भक्त संपूर्ण रामकथा एकाच ठिकाणी पाहू शकतील, अशी तीची इच्छा आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याशीही ती संपर्क साधणार आहे. जर हे झाले नाही. तर ही पेंटिंग विकून आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गरजू लोकांना मदत करणार असल्याचे तीने सांगितले. तसेच जान्हवी 'डोनेशन फॉर नीडी' नावाची एक स्वयंसेवी संस्था देखील चालवते. या माध्यमातून ती निधी गोळा करते आणि गरजूंना अन्न, कपडे इत्यादी किट वितरीत करते.

101 फुटाच्या कॅनव्हासवर संपूर्ण रामायण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.