ETV Bharat / bharat

GT vs CSK, IPL 2022 : गुजरातचा चेन्नईवर तीन विकेट्सने विजय - गुजरात चेन्नईची मॅच

गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 169 धावा केल्या. (GT vs CSK, IPL 2022) प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 19.5 षटकांत 7 गडी गमावून 170 धावा करून सामना जिंकला.

Gujarat beat Chennai by three wickets
Gujarat beat Chennai by three wickets
author img

By

Published : Apr 18, 2022, 6:57 AM IST

Updated : Apr 18, 2022, 8:32 AM IST

मुंबई - पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 29 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 3 विकेट्सनं विजय मिळवला. (Gujarat beat Chennai by three wickets) या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघानं चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला आहे.

पॉवरप्लेमध्ये संघाने दोन गडी गमावले - गुजरात टायटन्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. पहिल्या दोन षटकांत संघाने दोन विकेट गमावल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये गुजरातने तीन विकेट गमावल्या. (GT vs CSK IPL 2022 Match) साहा 11 धावा करून बाद झाला. तर, तेवतियाने 14 चेंडूत 6 धावा केल्या. यापूर्वी चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पॉवरप्लेमध्ये संघाने दोन गडी गमावले.

गुजरात टायटन्सने 6 पैकी 5 सामने जिंकले - उथप्पा 3 आणि मोईन अली 1 धावांवर बाद झाले. अंबाती रायडू 31 चेंडूत 46 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गायकवाड 48 चेंडूत 73 धावा करून बाद झाला. (Gujarat beat Chennai) जडेजाने शेवटच्या सामन्यात 12 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. गुजरात टायटन्सने 6 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.

मिलरने शानदार खेळी केली - इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला. या सामन्यात गुजरातच्या डेव्हिड मिलरने शानदार खेळी केली. त्याने 51 चेंडूत 94 धावांची दमदार खेळी खेळली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले.

पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या - शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर मिलरला धावा करता आल्या नाहीत. दुसऱ्या चेंडूवरही एकही धाव झाली नाही. पण तिसऱ्या चेंडूवर मिलरने षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर शिवम दुबेने मिलरचा अप्रतिम झेल घेतला पण चेंडू कमरेच्या वर गेल्याने नो बॉल देण्यात आला. मिलरने फ्री हिटवर चौकार मारला. मिलरने पाचव्या चेंडूवर दोन धावा घेत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा - धक्कादायक.. लडाखमध्ये भारतीय सीमेजवळ चीनने बसवले मोबाईल टॉवर

Last Updated : Apr 18, 2022, 8:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.