ETV Bharat / bharat

Group Captain Varun Singh Passes Away: हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन - Varun Singh Dies In Hospital

कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांचे निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

Group Captain Varun Singh
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह
author img

By

Published : Dec 15, 2021, 1:14 PM IST

बंगळुरू - तमिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतून ( CDS Bipin Rawat Chopper Crash ) बचावलेले एकमेव वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह ( Indian Air Force’s Group Captain Varun Singh ) यांचे आज निधन झाले. हेलिकॉप्टर दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. देशभरातून त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

  • Group Captain Varun Singh served the nation with pride, valour and utmost professionalism. I am extremely anguished by his passing away. His rich service to the nation will never be forgotten. Condolences to his family and friends. Om Shanti.

    — Narendra Modi (@narendramodi) December 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वरूण सिंह यांनी अभिमानाने, शौर्याने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झालं आहे. त्यांनी देशासाठी केलेली भरीव सेवा कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. ओम शांती, असे टि्वट मोदींनी केले आहे.

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं होतं. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झालं होतं. या अपघातामधून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले होते. मात्र, आज रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शौर्य चक्राने सन्मानित -

वरुण सिंह यांनी 2020 मध्ये एका मोठ्या संकटातून तेजस लढाऊ विमानाला वाचवलं होतं. त्यांच्या या धाडसामुळेच त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं.

उत्तर प्रदेशचे रहिवासी -

ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील कान्होली गावचे आहेत. वरुण सिंह हे भारतीय वायुसेनेमध्ये ग्रुप कॅप्टन म्हणून तैनात होते. वरुण सिंगचे वडील कर्नल केपी सिंग हे देखील लष्करातून निवृत्त झाले आहेत. मात्र, सध्या त्यांचे कुटुंब मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राहते.

हेही वाचा - Army Helicopter Crash LIVE Updates : हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले CDS बिपीन रावत यांचे निधन, कॅप्टन वरुण सिंह जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.