बारपेटा (आसाम) : गुवाहाटीत एक अजबच घटना समोर आली आहे. आसाममध्ये जोरॉनच्या निमित्ताने (लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी साजरा केला जाणारा विधी) वधूला भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. वराने नववधूला जोरानच्या निमित्ताने सनसिल्क शैम्पूसह निकृष्ट दर्जाच्या वस्तू भेट दिल्याबद्दल नववधूने वराला व्हाट्सअॅप वर मॅसेज करत त्याच्या अभियंता पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्या वधूच्या वागण्याने वराला अपमानाने भरलेला व्हॉट्सअॅप संदेश मिळाल्यानंतर सहा तासांपेक्षा कमी कालावधीनंतर वधूसोबतचा विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भेट दिल्याबद्दल लग्नास नकार : आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील हावली ( barpeta in assam ) येथे १४ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. वधूकडून अपमानास्पद व्हॉट्सअॅप मेसेज मिळाल्यानंतर, गुवाहाटी येथील व्यवसायाने इंजिनियर असलेल्या या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी वधूसोबत लग्न करणार नसल्याचे जाहीर केले. आणि त्याचा निर्णय वधूच्या कुटुंबाला कळवण्यात आला.
प्रकरण थेट पोलिस ठाण्यात : आपल्या मुलीशी लग्न न करण्याच्या वराच्या निर्णयाने हादरलेल्या वधूच्या कुटुंबाने गुवाहाटीला धाव घेतली. त्या तरूणाला मुलीला माफ करून तिच्याशी लग्न करण्यास मनधारणी केली. पण काम झाले नाही. तरुणीला लग्नासाठी नकार दिल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्या व्यक्तीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी व्हॉट्सअॅप मेसेजचा मजकूर गोळा केला आहे.