ETV Bharat / bharat

Grenade Attack in Pulwama : पुलवामा येथे ग्रेनेड हल्ल्यात बिहारचा मजूर ठार, नायब राज्यपालांनी भ्याड हल्ल्याचा केला निषेध

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, पुलवामाच्या गदूरा भागात हा हल्ला करण्यात ( Grenade Attack in jammu kashmir ) आला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद मुमताज असे आहे

ग्रेनेड
ग्रेनेड
author img

By

Published : Aug 5, 2022, 7:31 AM IST

पुलवामा ( श्रीनगर ) - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील गदूरा भागात दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांवर ग्रेनेड ( Grenade Attack in Pulwama ) फेकले. या दहशतवादी हल्ल्यात एक मजूर ठार झाला आहे. तर दोन जण जखमी झाले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, पुलवामाच्या गदूरा भागात हा हल्ला करण्यात ( Grenade Attack in jammu kashmir ) आला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद मुमताज असे आहे. तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी होता. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही मजूरही बिहारचे ( grenade attack on labours pulwama ) रहिवासी आहेत.

  • #UDPATE | The deceased outside labourer has been identified as Mohd Mumtaz, resident of Sakwa Parsa, Bihar. Injured have been identified as Mohd Arif & Mohd Majbool, residents of Rampur, Bihar. Both are stable: J&K Police

    — ANI (@ANI) August 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मजुरांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा नायब राज्यपालांनी केला निषेधपुलवामा येथील मजुरांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांनी तीव्र निषेध केला आहे. मोहम्मद मुमताज यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आहे. जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. मी लोकांना आश्वासन देतो की या घृणास्पद हल्ल्यामागील लोकांना शिक्षा होईल, असे नायब राज्यपालांनी म्हटले आहे.

पुलवामा येथे स्थलांतरित मजुरांवर ग्रेनेड हल्ला

15 जूनला दहशतवाद्यांनी केला होता ग्रेनेड हल्ला- दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी उशिरा पादशाही बाग भागात दहशतवाद्यांनी पोलिस दलावर ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागातील पादशाही बाग परिसरात पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. तेव्हा हा हल्ला झाला होता.

हेही वाचा-भारताच्या दुश्मनांना भरणार धडकी.. लेझर-गाइडेड अँटी-टँक क्षेपणास्त्राची अहमदनगरमध्ये यशस्वी चाचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.