श्रीनगर - दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हातबॉम्ब (ग्रेनेड) फेकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जम्मू काश्मीरमधील पुलावामा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत किमान चार नागरिक जखमी झाले आहेत.
पुलावामा चौकातील सुरक्षा दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी दुपारी हातबॉम्ब फेकला. मात्र, हा हातबॉम्ब रस्त्याच्याकडेला फुटला. जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हातबॉम्ब फेकण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
हेही वाचा-दिलासादायक! देशात कोरोना लसीकरणाने ओलांडला 75 कोटींचा टप्पा
गेल्या आठवड्यात शहरातील छानापोरा भागामध्ये हातबॉम्बच्या हल्ल्यात दोन महिलांसह तीन जण जखमी झाले होते. सुरक्षा दलाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील परीमपिरा-पँथाचौक या ठिकाणावरून 6 हातबॉम्ब निकामी केले आहे. हे हातबॉम्ब दहशतवाद्यांनी पेरलेले होते.
हेही वाचा-सीए अंतिम परीक्षेत बहिण-भावाचा डंका : बहिण नंदिनी देशातून पहिली तर सचिनला मिळाली 18 वी रँक
स्वातंत्र्याच्या चार दिवसापूर्वीही श्रीनगरमध्ये झाला होता ग्रेनेड हल्ला
दरम्यान, श्रीनगरमधील वर्दळीच्या अमिरा कदाल भागात 10 ऑगस्टला दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. अमिरा कदा पुलावरून जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या दिशेने दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. हा ग्रेनेड रोडच्या बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात तारीक अहमद यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर परिसरात दहशतवाद्याला शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.