हैदराबाद - जगातील सर्वात मोठी सिनेसृष्टी असलेल्या रामोजी फिल्म सिटीचे दरवाजे अमर्यादीत मनोरंजनासह शुक्रवारी 8 ऑक्टोबर रोजी पर्यटकांसाठी पुन्हा खुले झाले. पर्यटकांच्या चमुचे शुक्रवारी अतिशय जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. काही महिन्यांपासूनचा कडक लॉकडाऊन आणि प्रवासावरील निर्बंधांनंतर फिल्म सिटीत चित्रपटांचे सेट्स, विलक्षण देखावे आणि मनोरंजनाच्या अनुभवासाठी पर्यटकांची रीघ पुन्हा सुरू झाली आहे. पुन: शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी हजारो पर्यटक फिल्म सिटीला भेट देण्यासाठी आले होते. पर्यटकांचा फिल्म सिटीला भेट देण्याचा उत्साह कधीही संपणार नाही हेच यातून अधोरेखित झाले आहे.
कोविड महामारीची भीती हळूहळू दूर होत असताना सर्व मनोरंजक विभागांमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेसाठीची सर्व ती काळजी फिल्म सिटीकडून घेतली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे अतिशय काटेकोरपणे पालन केले जात आहे, तसेच सर्व पृष्ठभागांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण केले जात आहे. पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष प्रशिक्षण दिलेले सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. कोविड महामारीचा प्रसार रोखण्यासाठीच्या सुरक्षा उपायांनुसार काही महिने बंद राहिल्यानंतर फिल्म सिटीतील कलाकारही सादरीकरणासह सज्ज झाले आहेत. लाइव्ह डान्स, वाइल्ड वेस्ट स्टंट शो आणि आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेला बॅकलाईट शो, ज्यामध्ये अॅनिमेशन आणि स्टेजवरील सादरीकरणाचा अनोखा मिलाफ असतो. सर्व काही पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. बालकांसाठीचे प्ले झोन सर्व सुरक्षा उपायांसह संपूर्णपणे तयार करण्यात आले आहे. मोठ्या बोर्डवरील सापशिडीचा खेळ, बर्ड पार्क, एव्हीएन स्पेसीज, बटरफ्लाय पार्क पर्यटकांच्या स्वागतासाठी पूर्णपणे खुले झाले आहेत.
व्हिंटेज बसेस पर्यटकांना आकर्षक ठिकाणे आणि ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिकृतींची सफर घडवित आहेत. बाहुबली सिनेमाचा भव्य सेट पाहून पर्यटक रोमांचक अनुभवाचा आनंद घेत आहेत. रामोजी फिल्म सिटी हे हैदराबादमधील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थान असून हैदराबादला येणाऱ्या पर्यटकांनी एकदा इथे भेट द्यावीच असे हे ठिकाण असल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - खुशखबर! रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पुन्हा होणार खुली; पाहायला मिळणार 'ही' मनोरंजनाची ठिकाणे