नवी दिल्ली - बाईक अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये काहीवेळा मुलंही बळी पडतात. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ( Govt's new rules for kids ) मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नियमाचे ( Two Wheeler Traffic Rules in India ) पालन न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
नव्या नियमांनुसार, दुचाकी वाहनांवरून मुलांना नेताना आता हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं याबाबत नवी नियमावली जारी केलीये. त्यानुसार 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना दुचाकीवर बसवताना त्यांच्या मापाचं हेल्मेट बंधनकारक असेल. तसेच दुचाकीस्वारांना मुलांसोबत प्रवास करताना दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पेक्षा जास्त नसावा याची खात्री करणे देखील नियमानुसार बंधनकारक आहे.
देशात दररोज हजारो रस्ते अपघात (Accident) होतात. यातील काही लोक अपघातांना बळी पडतात, तर काही लोकांचं नशीब चांगलं असतं आणि ते वाचतात. बहुतेक अपघात हे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याने होतात. म्हणून अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारनं याबाबत कठोर पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.
हेही वाचा - Chandiwal Commission : आज मंत्री नवाब मलिक हजर होणार चांदीवाल आयोगासमोर