नवी दिल्ली - देशातील रस्त्यांची पायाभूत सुविधा या 2024 पर्यंत अमेरिकेतील दर्जाप्रमाणे करणार ( road infrastructure equivalent to USA ) असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ( Road Transport Minister Nitin Gadkari ) नितीन गडकरी यांनी राज्यसभेत माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात ( Question Hour in the Upper House ) खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. रस्ते सुरक्षेसाठी लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ( awareness for road safety ) सांगितले. रस्ते पायाभूत सुविधांचा विस्तार ( Nitin Gadkari on road expansion ) हा केवळ प्रश्न नाही. त्याचबरोबर रस्ते अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, लोकांमध्ये जनजागृती आणि शिक्षण या समस्या असल्याचे गडकरींनी सांगितले.
हेही वाचा-Rahul Kanal-Nitesh Rane : राहुल कनाल यांनी पाठवली नितेश राणेंना कायदेशीर नोटीस
रस्त्यांवर वाढलेले अपघात चिंताजनक बाब
भारतामध्ये लोकांना चालकाचा परवाना सहजरित्या मिळत असल्याचे त्यांनी काँग्रेस खासदार एल. हनुमनथैया ( Congress MP L Hanumanthaiah ) यांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. रस्त्यांवर वाढलेले अपघात ( number of accidents on National Highway ) ही चिंताजनक बाब आहे. त्यावर सरकारकडून योग्य ती उपाययोजना सुरू असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.
दरवर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू
दरवर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. ही आकडेवारी युद्धामधील होणाऱ्या मृत्यूहून जास्त आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्र ( black spots of accidents ) पाहिली जातात. तिथे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.