ETV Bharat / bharat

अद्याप कोरोना संपलेला नाही, केंद्र सरकार दुर्लक्ष करतंय - राहुल गांधी - राहुल गांधी लेटेस्ट टि्वट

केंद्राने कोरोना परिस्थिती हाताळण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच कोरोनाबाबत सरकारला अतिविश्वास आहे. मात्र, अद्याप कोरोना संपलेला नाही, असे टि्वट राहुल गांधींनी केले.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Feb 17, 2021, 4:00 PM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून अद्याप कोरोना महामारी संपलेली नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. केंद्राने कोरोना परिस्थिती हाताळण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच कोरोनाबाबत सरकारला अतिविश्वास आहे. मात्र, अद्याप कोरोना संपलेला नाही, असे टि्वट राहुल गांधींनी केले.

दक्षिण आफ्रिकेतील एसएआरएस-सीओव्ही -२ प्रकारातील कोरोनाची भारताच्या चार जणांना लागण झाली आहे. तर एक जणाला ब्राझीलमध्ये आढळलेल्या कोरोनाची बाधा झाली आहे, ही माहिती केंद्राने मंगळवारी दिली.

कोरोना रुग्ण संख्या -

देशात नव्या 11 हजार 610 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1 कोटी 9 लाख 37 हजार 320 वर पोहचला आहे. आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 44 हजार 858 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नव्या 100 मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या 1 लाख 55 हजार 912 आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.