नवी दिल्ली - ‘खूब लडी मर्दानी। वह तो झाँसीवाली रानी थी। ही कविता तुम्ही ऐकलीच असेल. मात्र, या कवितेच्या लिखिका तुम्हाला माहिती आहेत का? सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका सुभद्राकुमारी चौहान यांनी ही ओजस्वी कविता लिहली आहे. सुभद्राकुमारी चौहान या देशातील पहिल्या महिला सत्याग्रही होत्या. त्यांच्या 117 व्या जंयती निमित्त आज गुगलने आपल्या खास डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. गुगलकडून सुभद्राकुमारी चौहान यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
गुगलने कवयित्री, लेखिका आणि स्वतंत्रता सेनानी सुभद्राकुमारी चौहान यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जीवनावर आणि उपलब्धीवर खास डूडल तयार केले आहे. गुगलने तयार केलेल्या डूडलमध्ये सुभद्राकुमारी चौहान यांनी एक साडी परिधान केलेली आहे. तर त्यांच्या हातात लेखनी आणि कागद आहे. हे डूडल कलाकार प्रभा माल्या यांनी तयार केले आहे.
सुभ्रदाकुमारी यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी अलाहाबादजवळील निहालपूर गावात झाला. लहानपणापासूनच त्या भाषण देत लिखानाची त्यांना आवड होती. त्यांनी पहिली कविता वयाच्या 9 वर्षी लिहली होती. सुभद्रा यांना चार बहिणी आणि दोन भाऊ होते. मुलींच्या शिक्षणाला विरोध असताना सुभद्रा यांना त्यांच्या वडिलांना शाळेत पाठवले. परंपरेनुसार त्यांनी वयाच्या 15 वर्षी सुभ्रदाचे लग्न ठाकूर लक्ष्मणसिंह चौहान यांच्याबरोबर लावून दिले. मात्र, सुभद्रा पतीच्या बाबतीत नशिबवान ठरल्या. त्यांचं शिक्षणही लग्नानंतर चालू राहिलं. सुभद्रा यांना त्यांच्या पतीचा नेहमीच पाठिंबा असे. दोघेही तनमनाने देशकार्य करत. स्वतंत्रा आंदोलनाच्या दरम्यान सुभद्रा अनेकदा तुरुंगात गेल्या. 5 फेब्रुवारी 1948 रोजी एका कार अपघातात त्यांचे निधन झाले.
अस्वस्थ करणाऱ्या कविता...
सुभद्राकुमारी चौहान यांनी अनेक कविता रचल्या. यात त्यांनी सर्वांत जास्त प्रसिद्ध कविता म्हणजे ‘झाँसी की रानी’. तसेच त्यांनी जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी केलेल्या हत्याकांडावर ‘जलियाँवाला बागमें बसंत’ ही कविता रचली होती. त्यांच्या ‘वीरोंका कैसा हो बसंत’, ‘राखी की चुनौती’, यांसारख्या अनेक कविता आजही अस्वस्थ करतात.
सेकसरिया पुरस्काराने गौरव -
भारतीय डाक विभागाने 6 ऑगस्ट 1976 रोजी सुभद्राकुमारी चौहान यांच्या सन्मानार्थ 25 पैशांचं डाक तिकिट जारी केलं आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलानेदेखील 28 एप्रिल 2006 रोजी एका नवीन तटरक्षक जहाजाला सुभद्राकुमारी चौहान यांचं नाव दिलं. तर सुभद्राकुमारी चौहान यांना 1931 मध्ये 'मुकुल' या कविता संग्रहासाठी आणि 1932 मध्ये 'बिखरे मोती' या कथा संग्रहासाठी सेकसरिया पुरस्काराने गौरवण्यात आले. सुभद्रा यांचे झाँसी की रानी, कदम्ब का पेड़ आणि सभा का खेल हे त्यांचे बाल साहित्य चांगलेच प्रसिद्ध आहे.
हेही वाचा - सरला ठकराल यांच्यावर गुगल डुडल, कोण होत्या त्या? जाणून घ्या..
हेही वाचा -'गुगल'ने 'डुडल'द्वारे मानले आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार