ETV Bharat / bharat

Bhupen Hazarika: 96वी जयंती साजरी करत Google ने डूडलद्वारे भूपेन हजारिका यांना वाहिली श्रद्धांजली - Filmmaker Bhupen Hazarikas 96th Birth Anniversary

आज संगीतकार, गीतकार आणि लेखक भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांची 96 वी जयंती आहे. याच दिवसाचं निमित्त साधून सर्च इंजिनगुगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवले आहे.

Bhupen Hazarika
भूपेन हजारिका यांची 96 वी जयंती
author img

By

Published : Sep 8, 2022, 11:09 AM IST

Updated : Sep 8, 2022, 12:53 PM IST

आज संगीतकार, गीतकार आणि लेखक भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांची 96 वी जयंती आहे. याच दिवसाचे निमित्त साधून सर्च इंजिनगुगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. या खास डूडलद्वारे त्यांनी भूपेन हजारिका यांना मानवंदना दिली आहे. भूपेन हजारिका यांचा जन्म 08 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादिया येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव नीलकांत आणि शांतीप्रिया होते. भूपेन यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल

वयाच्या दहाव्या वर्षी रेकॉर्ड केलं पहिलं गाणे - बालपणी भूपेन हजारिका ( Bhupen Hazarika ) यांना संगीताची आवड निर्माण झाली. भूपेन हजारिका यांच्या संगीताने प्रख्यात आसामी गीतकार ज्योतिप्रसाद अग्रवाला आणि चित्रपट निर्माते बिष्णू प्रसाद राभा यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी भूपेन हजारिका यांना त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड करण्यास मदत केली, तेव्हा भूपेन हजारिका हे 10 वर्षांचा होते. केवळ 12 वर्षे वय असताना भूपेन हजारिका हे इंद्रमालती काक्सोते कोलोसी लोई आणि बिस्वो बिजॉय नौजवान या दोन चित्रपटांसाठी गाणी लिहित आणि रेकॉर्ड करत होते.

पुरस्कारांनी गौरव - भूपेन हजारिका यांचा अनेक पुरस्कारानं गौरव करण्यात आला. 1975 मध्ये उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 1987 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1977 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. 2012 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण आणि 2019 मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. भूपेन हजारिका यांनी 05 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गुगलचं खास डूडल - भूपेन हजारिका यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डूडल बनवलं आहे. या डूडलमध्ये भूपेन हजारिका हे पेटी वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्यासमोर एक माईक देखील आहे. मुंबईतील रुतुजा माळीनं या गुगल डूडलचं illustration तयार केलं आहे. गुगलच्या या डूडलद्वारे भूपेन हजारिका यांना मानवंदना देण्यात आली आहे.

सांस्कृतिक सुधारकांचा सहभाग होता - भूपेन हजारिका हे ईशान्य भारतातील प्रमुख सामाजिक-सांस्कृतिक सुधारकांपैकी एक होते. त्यांच्या संगीताने सर्व स्तरातील लोकांना एकत्र केले. त्याचे वडील मूळचे शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा शहरातील होते. त्याचे मूळ राज्य, आसाम हा एक प्रदेश आहे जो नेहमीच विविध जमाती आणि अनेक स्वदेशी गटांचे निवासस्थान आहे. भूपेन हजारिका यांनी सुरुवातीचे शिक्षण गुवाहाटी येथून केले. त्यानंतर त्यांनी बीएचयूमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. कॉलेजपासून त्यांची संगीताची आवड वाढली. भूपेन यांना बनारसमधील उस्ताद बिस्मिल्ला खान, कंठे महाराज आणि अनोखे लाल यांच्याकडून शास्त्रीय संगीताची साथ लाभली. त्यानंतर भूपेन हजारिका यांनी त्यांच्या आसामी गाण्यांमध्ये ही गायन पद्धत वापरली.

Last Updated : Sep 8, 2022, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.