शहडोल - सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात कोणतीही माहिती संगनकाच्या पटलावर चुटकीसरशी उपलब्ध होते. एका क्लिकवर देश- दुनियाची माहिती देणाऱ्या गुगल (Google) नंतर मध्यप्रदेश राज्यातील शहडोल जिल्ह्यातील एक अडीच वर्षाचा बालक चर्चेत आला आहे. तो डोळ्याची पापणी लवते न लवते संपूर्ण जगाची माहिती देतो. त्याच्या या असामान्य बुद्धीमुळे लोक त्याला ‘गूगल बॉय’ (Google Boy) म्हणू लागले आहेत. या मुलाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Google Boy Devesh) आपल्या वडिलांना गमावले. त्यामुळे आजा-आजी व आई त्याचे पालनपोषण करत आहेत.
एक अडीच वर्षाचा बालक रडण्याशिवाय व बालसुलभ लीला करण्याशिवाय दुसरे काय करू शकते. मात्र शहडोलमधील देवेशला पाहून तुमचा विचार बदलेल. या अडीच वर्षाच्या बालकाला तुम्ही काहीही विचारा, देश-राज्यांच्या राजधान्या असू देत, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे असू देत, विदेशी नेत्यांविषयी विचारा, देवेश सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्षणात देतो. तेही अधिक विचार न करता व न अडखळता त्यामुळेच लोक त्याला Google Boy म्हणतात.
प्रत्येक वडिलांची इच्छा असते की, त्याच्या मुलाने मोठे होऊन नाम कमवावे. त्याचबरोबर आजोबांचे स्वप्न असते की, त्यांच्या नातवाने खानदानाचे नाव रोशन करावे. मात्र शहडोलमधील धनंजय सिंह यांचे नातू देवेश याने तर आतापासूनच कमाल सुरू केली आहे. लोक धनंजय सिंह यांना त्यांच्या नावाने कमी आणि Google Boy Devesh चे आजोबा या नावाने अधिक ओळखू लागले आहेत. ज्या प्रकारे Search Engine Google गूगल काही सेंकदात प्रश्नाचे उत्तर देते त्याचप्रमाणे देवेशही वेळ न दवडता प्रश्नांची बरोबर उत्तरे देतो. देश, राज्यांच्या राजधान्या, मुख्यमंत्र्यांची नावे. केंद्रीय मंत्र्यांची नावे, दुसऱ्या देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांची नावे तो न चुकता सांगतो.
हे ही वाचा - Baalveer Special : वडिलांचे स्वप्न साकार करताहेत 'या' दोघी, जाणून घ्या छिंडवाड्याचा सोना-सारा सिस्टर्स बँड!
देवेशची आई नेहा सांगते की, देवेश दीड वर्षाचा असतानाच बोलायला लागला होता. तो एकदा ऐकलेली गोष्ट कधीही विसरत नाही. आपल्या मुलाची ही अद्भुत प्रतिभा पाहून आई आश्चर्यचकीत झाली. त्यानंतर घरच्या लोकांनी तो जे काही विचारतो ते सर्व सांगितले. नेहा म्हणाल्या की, आम्ही त्याला नवनवीत गोष्टी सांगत गेलो व तो लक्षात ठेवत गेला. घरचे लोक त्याला खेळवत-खेळवत नवनवीत माहिती देत असतात.
देवेश सिंह विषयी त्याचे आजोबा धनंजय सिंह म्हणतात की, इतक्या छोट्या मुलाला हे सर्व लक्षात ठेवणे कठीण असते. मात्र याची स्मरणशक्ती अद्भूत आहे. तो नेहमी काही ना काही प्रश्न विचारत असतो. त्याच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ लागलो व हळू-हळू हे सर्व त्याला लक्षात राहू लागले. धनंजय सिंह म्हणतात की, त्याची जिज्ञासा खूप आहे. प्रत्येक गोष्टीविषयी तो प्रश्न विचारत असतो. सध्या तो त्याच्या काकाबरोबर हनुमान चालीसा पाठ करत आहे.
देवेशचा जन्म 27 ऑगस्त 2019 रोजी झाला. देवेश सिंहचे वडिलांचे एप्रिल 2021 मध्ये कोरोनाने निधन झाले. देवेशचे आजोबा धनंजय एक शिक्षक आहेत. आज देवेशला सामान्य ज्ञानांच्या अनेक गोष्टी तोंडपाठ आहेत. आपल्या गोड आवाजात तो मोठ-मोठ्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे देतो. तेव्हा उपस्थित लोकांच्या भुवया उंचावल्या जातात.