सिधी ( मध्यप्रेदश ) : सोन घरियाल अभयारण्य ( Son Gharial Sanctuary ) परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. आता येथील वातावरण सुसरींसाठी अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. सोन घरियाल अभयारण्यात 72 अंड्यांपासून 72 सुसरींनी जन्म घेतला ( 72 children born to two female crocodiles ) आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार वेळ निश्चित करून घडियाल अभयारण्यातील 6 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सोन नदीच्या काठावरील वाळूत मादी सुसर अंडी घालते. अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांच्यासाठी वाळूची जागा तयार केली होती.
आता आणखी सुसरी जन्माला येतील : आणखी सुसरी जन्माला येण्याची शक्यता आहे. सुसरीला जन्म दिल्यानंतर त्यांच्या शिकारीची भीती कायम आहे. नर सुसर, सुसरी यांच्यासह प्राणी त्यांची शिकार करू शकतात. अशा परिस्थितीत दोन्ही मादी सुसरी त्यांच्या सुरक्षेसाठी आजूबाजूला असतात. दोन्ही बाजूंनी ढाल बनून त्या आपल्या मुलांवर लक्ष ठेवत असल्याचे सांगण्यात आले आहे. लहान सुसरींना नैसर्गिकरित्या दोन आठवडे अन्नाची गरज नसते. यानंतर त्यांना छोटे मासे दिले जातात.
17 डिसेंबर रोजी आणले होते नर सुसर : सोन घरियाल अभयारण्यात नर सुसर नसल्यामुळे सुसरींची संख्या वाढत नव्हती. अशा स्थितीत 17 डिसेंबर रोजी मुरैना येथून एक नर सुसर आणण्यात आला आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक चिपही बसवण्यात आली. त्यामुळे 5 महिन्यांत 72 सुसरींचा जन्म झाला. संजय व्याघ्र प्रकल्प सिद्धी येथील सीसीएफ वायपी सिंग सांगतात की, सोन घरियाल अभयारण्यात दोन माद्यांच्या 72 अंड्यांमधून 72 सुसरी जन्माला आल्या आहेत. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांसह सीसीटीव्ही कॅमेराही बसवण्यात आला आहे. खूप दिवसांनी हा आनंद मिळाला.