ETV Bharat / bharat

महिलेला खांदा देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, शेवटी पोलिसांनी नेले स्मशानभूमीत - गोड्डा

झारखंडच्या गोड्डा पोलिसांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होते आहे. (Godda Police set Example of Humanity). इथे एका इन्स्पेक्टरने आपल्या सहकाऱ्यांसह एका महिलेच्या मृतदेहाला खांदा दिला. त्यानंतर त्यांनी मिळून तिचा अंत्यसंस्कारही केला. (police gave shoulder to bier of woman).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 19, 2022, 10:35 PM IST

गोड्डा (झारखंड) : सामान्यत: प्रसारमाध्यमांमध्ये नेहमी पोलिसांची नकारात्मक प्रतिमा दिसून येते. मात्र आता झारखंडच्या गोड्डा पोलिसांची मानवता सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. (Godda Police set Example of Humanity). इथे एक इन्स्पेक्टर स्वतः खांद्यावर मृतदेह घेऊन स्मशानभूमीत घेऊन गेला. यावेळी पोलिस कर्मचारीही त्याच्यासोबत होते. (police gave shoulder to bier of woman).

खांदा द्यायला कोणीही आले नाही : झाले असे, गोड्डा येथील पाथरगामा पोलीस स्टेशन हद्दीतील महेशलिट्टी पंचायतीच्या गंधर्वपूर गावात श्रावण कुंवर यांच्या पत्नी सबिना हिचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. तिला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिचा मृतदेह गावी नेण्यात आला. त्यांच्या घरात दोनच सदस्य होते, एक महिलेचा नवरा आणि दुसरा तिचा मेहुणा. परस्पर नात्यातील वादामुळे मयताला खांदा देणारे कोणी नव्हते. यामुळे कोणीही पुढे आले नाही. पाथरगामा पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण कुमार यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण कुमार आपल्या टीमसह गावात पोहोचले आणि त्यांनी स्वत: मृतदेहाला खांदा तर दिलाच, शिवाय आपल्या सहकारी जवानालाही खांदा देण्यासाठी प्रोत्साहित केले. अशाप्रकारे पोलिसांनी या महिलेला स्मशानभूमीत नेऊन तिचा अंत्यसंस्कार केला.

कोरोनाच्या काळातही केली होती सेवा : आता या घटनेनंतर पोलिसांची ही चांगली प्रतिमा समाजामध्ये दिसून येते आहे. गोड्डा पोलीस कर्मचाऱ्यांचा असा फोटो कोरोनाच्या काळातही व्हायरल झाला होता. एरवी बेकायदेशीर खंडणीसाठी कुप्रसिद्ध असलेले पोलिस त्यावेळी लोकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटताना दिसले. यांचा पोलीस खात्याने गौरवही केला होता. गोड्डा पोलिसांच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.