ETV Bharat / bharat

वर्षभरात एनसीबीची 11 ठिकाणी कारवाई, १८ जणांना घेतले ताब्यात - etvbharat maharashtra

एकीकडे कोरोनाचे कमी प्रमाण होत आहे. दुसरीकडे गोव्यात अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्याचे धागेदोरे बॉलिवूड व देशातील इतर राज्यांशी जोडले गेले आहेत. यावर मागील वर्षभरात एनसीबीने 11 ठिकाणी कारवाई करत राज्यातील व परराज्यातील अनेकांना ताब्यात घेतले आहे.

गोव्याचे पर्यटनमंत्री
गोव्याचे पर्यटनमंत्री
author img

By

Published : Oct 25, 2021, 4:07 PM IST

Updated : Oct 25, 2021, 5:21 PM IST

पणजी/सिंधुदुर्ग- पर्यटकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या पर्यटकांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. अमली पदार्थांचे सेवन करणारे पर्यटक नकोत, असे ते म्हणाले आहेत. या पार्श्वभूमिवर ईटीव्ही भारतने गोव्यातील अंमली पदार्थांची सद्यःस्थिती जाणून घेतली.

आपण राज्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्या पर्यटकांना कधीही थारा देणार नसल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले आहे. यापूर्वी पर्यटमंत्र्यांनी म्हटले होते की, बस, वाहनांमधून स्वयंपाक करणारे पर्यटक नको आहेत. या विधानांमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

वर्षभरात एनसीबीची 11 ठिकाणी कारवाई

हेही वाचा-गोवा : पर्यटनासाठी सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार - पर्यटनमंत्री

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून राज्यातील पर्यटन बंद होते. त्यामुळे राज्यातील अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. मात्र, मागील दोन महिन्यांपासून राज्यातील पर्यटन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच राज्यातील आंतरराष्ट्रीयपर्यटन सुरू होण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू होत असताना अमली पदार्थांचे वाढते सेवन हा प्रश्न समोर येत आहे.

हेही वाचा-बसमध्ये स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांची राज्याला गरज नाही - गोवा पर्यटनमंत्री

राज्यात वर्षभरात एनसीबीची 11 ठिकाणी कारवाई-
राज्यातील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्याचे धागेदोरे बॉलिवूड व देशातील इतर राज्यांशी जोडले गेले आहेत. यावर मागील वर्षभरात एनसीबीने 11 ठिकाणी कारवाई करत राज्यातील व परराज्यातील अनेकांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा-EXCLUSIVE: समीर वानखेडे यांच्या मूळ गावी ईटीव्ही भारत, कुटुंबांनी नावाबाबत दिले 'हे' स्पष्टीकरण

एनसीबीच्या कारवाया

  • मार्च ते जून महिन्यात एनसीबीने ६ ठिकाणी कारवाया करत १८ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एलएसडी, कोकेन, गांजा, हेरॉईन, मेफेड्रोन यासारखे अंमली पदार्थ ताब्यात घेतले. यात उत्तर गोव्यात पाच तर दक्षिण गोव्यात एका ठिकाणी कारवाई केली.
  • सप्टेंबर महिन्यात एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई व गोव्यात संयुक्तपणे 4 ठिकाणी कारवाई करत अर्जुन रामपाल याचा मेहुण्याला गोव्यातून ताब्यात घेतले होते.
  • 6 सप्टेंबर 2019 ला नायजेरियन नागरिक चिसोम डेव्हिडला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 0.186 ग्रॅम एलएसडीच्या 11 ब्लॉट्स व 5. 4 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते.
  • 22 आणि 23 सप्टेंबरला शिवोलीम गोवा येथून नौमान सावेरी याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून 0.2 ग्रॅम एलएसडीच्या 12 ब्लॉट्स व 3 एमडीएम गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईचे धागेदोरे हैदराबादपर्यंत जोडले गेले होते. तपासादरम्यान दुसरा आरोपी म्हणून सिद्दीक अहमद याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती.
  • 24 सप्टेंबर 2021 ला उत्तर गोव्यातील नागोवा येथून मयूर मोहनांनी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 4.8 ग्रॅम वजनाच्या 10 एमडीएमए गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. मोहनांनी हा उल्हासनगर, ठाणे येथील रहिवाशी आहे.
  • 24 सप्टेंबरला डेमेड्रीअस ओगीसीलाओस या दक्षिण आफ्रिकन नागरिकाला ताब्यात घेत त्याच्याकडून 32.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आली होती.
    डेमेड्रीअस ओगीसीलाओस याचे बॉलीवूडशीही संबंध असल्याचे उजेडात आले आहे.

    दरम्यान, येत्या थोड्याच दिवसात एनसीबी अधिक ठिकाणी कडक कारवाई करणार आहे.

काय म्हणाले होते पर्यटनमंत्री?

मूठभर बेशिस्त पर्यटकांमुळे गोव्याच्या संस्कृतीला ठेच पोहोचत आहे. बेशिस्त, गुन्हेगारी, ड्रग्जमाफियांमुळे गोव्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होत आहे, म्हणून गोव्याला शिस्तबद्ध व संस्कृती जपणाऱ्या पर्यटकांची गरज असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनासाठी गोव्याची वेगळी ओळख आहे. अनेक पर्यटक जिवाचा गोवा करण्यासाठी येथे येत असतात. मात्र, यातील मूठभर पर्यटकांमुळे येथील पर्यटनाला, संस्कृतीला, पर्यावरणाला गालबोट लागत आहे. यावर पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. बेशिस्त व बसमध्ये स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांची राज्याला गरज नसल्याचेही आजगावकर यांनी सांगितले.

Last Updated : Oct 25, 2021, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.