ETV Bharat / bharat

BJPs Manifesto For Goa : गोमंतकीय अर्थव्यवस्था करणार ५० अब्ज डॉलरची.. गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ( Goa Assembly Election 2022 ) भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला ( BJPs Manifesto For Goa ) आहे. त्यामध्ये गोव्याची अर्थव्यवस्था ५० अब्ज डॉलर करणे यासह विविध प्रकारची आश्वासने गोवेकरांना देण्यात आली आहेत. गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी भाजपला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांनी केले आहे.

गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
author img

By

Published : Feb 8, 2022, 3:08 PM IST

Updated : Feb 8, 2022, 6:39 PM IST

पणजी ( गोवा ) : भाजपने आज गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ( Goa Assembly Election 2022 ) जाहीरनामा प्रकाशित ( BJPs Manifesto For Goa ) केला. या जाहीरनाम्यात गोवेकरांसाठी २२ आश्वासने भाजपने दिली आहेत. मागच्या १० वर्षात भाजपने सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी तसेच गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवेकरांकडे केली ( Goa CM Pramod Sawant ) आहे. स्वयंपूर्ण गोव्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

गोमंतकीय अर्थव्यवस्था करणार ५० अब्ज डॉलरची.. गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

काँग्रेसकडून धूळफेक : गडकरी

काँग्रेसने केलेली ८० रुपये लिटर पेट्रोलची घोषणा ही धूळफेक आहे. कारण येणाऱ्या काळात इथेनॉल ६२ रुपये दराने विकले जाणार आहे. येणाऱ्या काळात सर्व गाड्या या इथेनॉलवर चालणाऱ्या असतील. मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली गोव्याला एक नवी दूरदृष्टी दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे गोव्याचा विकास अधिक झाला आहे. गोव्याला २५ हजार कोटी दिले आणि येणाऱ्या काळात १५ हजार कोटी देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी ( Minister Nitin Gadkari ) दिली. गोव्यात रस्ते क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाला असून, टूरिझम क्षेत्रातही दुप्पट जॉब उपलब्ध होतील अशी माहिती गडकरी यांनी दिली.

भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासने

  • खनिज व्यवसाय सुरू करणे
  • एकत्र वाढू एकत्र समृद्ध होऊ
  • गरिबी निर्मुलन करणे
  • गोव्याचा सुवर्ण क्षण
  • गोव्यात सुवर्ण पुरस्कार विजेते घडविण्यासाठी क्रीडा क्षेत्र विकसित करणे
  • गोमंतकीय अर्थव्यवस्था 50 अब्ज डॉलरची रूपांतरण
  • काम करा समृद्ध व्हा योजना
  • वर्क फ्रॉम होम ला चालना देण्यासाठी
  • अत्याधुनिक संशोधन केंद्र उभारणे
  • स्वयंपूर्ण युवा
  • स्वयंपूर्ण गोवा योजना राबविणे
  • सर्व गोमंतांक्यासाठी आरोग्य सुविधा राबविणे
  • गोमंतकीय अन्नदात्याची उत्पन्न वृद्धी
  • मत्स्योद्योग वाढविणे
  • महिला स्वावलंबन
  • महिला उद्योजिका वाढविणे
  • हरित गोव्यासाठी स्वछ वाहतूक सुविधा उभारणे
  • नदी वाहतूकला चालना

Last Updated : Feb 8, 2022, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.