पणजी - गोव्याची ओळख असणाऱ्या नाताळ सणाला (Goa Christmas Festival) राज्यात जोरात सुरुवात झाली आहे. एकीकडे राज्यात कोविड आणि ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढत असताना राज्यात मात्र नववर्ष आणि नाताळ सण साजरा करतानाचा उत्साह मात्र वेगळा आहे.
गोव्यात ख्रिसमसची धूम सुरू -
गोव्यात ख्रिसमसची धूम सुरू झाली आहे. नववर्ष आणि नाताळच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. खाद्यपदार्थ आणि रंगीबेरंगी लायटिंगने बाजारपेठ फुलली आहे. गोव्याची ओळख असणाऱ्या नाताळ सणाला राज्यात जोरात सुरुवात झाली आहे. एकीकडे राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना राज्यात मात्र नववर्ष आणि नाताळ सण साजरा (New Year and Christmas celebration in goa) करतानाचा उत्साह मात्र वेगळा आहे.
नाताळच्या सेलिब्रेशनसाठी राज्यातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत, यात मुख्यत्वेकरून केक, वाईन, गोवन खाद्यपदार्थ यांच्यासोबत विविध प्रकारच्या लायटिंग, सांताक्लॉसच्या टोप्या, विविध प्रकारची चॉकलेट बाजारात उपलब्ध झाली आहेत.
शुक्रवार रात्रीपासून सुरू होणार प्रभू येशूंचा जन्मोत्सव -
नाताळची ओळख म्हणजे प्रभू येशूच्या जन्माचा देखावा. गोव्यात बहुतांश ठिकाणी हा देखावा साकार करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यांतील विविध चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करून त्यानिमित्ताने प्रार्थना करण्यात येणार आहे. याला कोंकणी भाषेत मास म्हणण्यात येते.
चर्च सजले -
राज्यात नाताळच्या निमित्ताने चर्चची सजावट करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अनेक घरासमोर लायटिंग करण्यात आली आहे.
हॉटेल्स फुल्ल, ग्राहकांसाठी अनेक ऑफर -
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामित्ताने राज्यातील सर्वच हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. अनेक हॉटेलमध्ये नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी विविध ऑफर देण्यात आल्या आहेत.