पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे विजयी झाले आहेत. साकळीतून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आघाडी घेतली होती. काँग्रेसचे धर्मेश सगलांनी यांचा त्यांनी पराभव केला.
उत्तर गोवा जिल्ह्यातील साकेलीन मतदारसंघांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजय प्राप्त केला आहे. यंदाही सावंत साखळी मतदारसंघात आपल्या विजयाची पताका लावणार का याबाबत मतदारांमध्ये औत्सुक्याचं वातावरण आहे.
डाॅ. प्रमोद सावंत हे मनोहर पर्रीकर यांच्या निधना नंंतर मुख्यमंत्री झाले. सांकेलीम मतदार संघातून नशिब अजमावत आहेत. सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी पांडुरंग आणि पद्मिनी सावंत यांच्या पोटी झाला. त्यांनी कोल्हापुरातील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून आयुर्वेद, वैद्यक आणि शस्त्रक्रियेची पदवी आणि पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सामाजिक कार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.