ETV Bharat / bharat

गोवा सरकारचा प्रशासनावर ताबा नाही, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांची टीका - महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक

गोव्यातील भाजप सरकारचा प्रशासनावरील ताबा सुटला आहे. आज सरकारच्या विवीध खात्यांमध्ये कसलाच समन्वय नाही हे परत एकदा उघड झाले आहे. अशी टीका गोवा महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी केली आहे.

गोवा सरकारचा प्रशासनावर ताबा नाही, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांची टीका

author img

By

Published : Jun 7, 2021, 1:23 AM IST

पणजी (गोवा) - गोव्यातील भाजप सरकारचा प्रशासनावरील ताबा सुटला आहे. आज सरकारच्या विवीध खात्यांमध्ये कसलाच समन्वय नाही हे परत एकदा उघड झाले आहे. गोव्यातील दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केलेले आदेश हे दोन दिवसांमागे शिक्षण खात्याने जारी केलेल्या आदेशापासून पुर्णपणे वेगळे आहेत. यावरुन "पार्टी व्हिथ अ डिफरंस" च्या सरकारात ताळमेळ नसल्याचे परत एकदा उघड झाल्याची टीका गोवा महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी केली आहे. तर, मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचे हे उदाहरण आहे असेही, त्या म्हणाल्या आहेत.

गोवा सरकारचा प्रशासनावर ताबा नाही, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांची टीका

शिक्षण खाते शाळा सुरु करण्याचा आदेश काढते, तर जिल्हाधिकारी बंदचा

शिक्षण खात्याच्या संचालकांनी ४ जून रोजी एक आदेश जारी करुन सर्व व्यवस्थापकीय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ७ जून पासुन पुर्ण वेळ शिक्षण संस्थात कामावर हजर रहावे असे निर्देश दिले. त्याच दिवशी उच्च-शिक्षण संचालकांनी आदेश जारी करुन कॉलेज व विद्यापीठ व्यवस्थापकीय कर्मचारी व शिक्षक यांना ७ जून पासून गोवा विद्यापीठात हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच, कॉलेज शिक्षकांना आपल्या कॉलेजेमध्ये ८ जून २०२१ पासून पुर्णवेळ कामावर हजर राहण्याचे सांगितले, असे बिना नाईक यांनी निदर्शनास आणुन दिले आहे. आज ६ जून २०२१ रोजी दक्षिण व उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळे आदेश जारी करुन, कोविड महामारीमुळे वाढविलेल्या कर्फ्यू काळात शाळा- कॉलेत व इतर शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याचे, स्पष्ट केले आहे. सदर आदेशात केवळ परीक्षा देणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल केल्याचे नमुद करण्यात आल्याचे बिना नाईक यांनी म्हटले आहे.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुणाचा आदेश पाळावा

गोव्यातील तमाम शैक्षणिक संस्थात काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर व व्यवस्थापन कर्मचारी यांनी नेमका कुणाचा आदेश पाळावा, असा प्रश्नही बिना नाईक यांनी विचारला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी घरी रहावे की ४ जून रोजीच्या शिक्षण खात्याच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कामावर हजर रहावे, हे डॉ. प्रमोद सावंतानी स्पष्ट करावे अशी मागणी बिना नाईक यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचे हे उदाहरण आहे

आज जारी केलेले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश व दोन दिवसांपुर्वीचे शिक्षण खात्याचे आदेश यावरुन भाजप सरकारमध्ये एक वाक्यता नसल्याचे परत एकदा उघड झाले आहे. शिक्षण व गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचे हे उदाहरण आहे. स्वतःला 'पार्टी व्हिथ अ डिफरंस' म्हणणारे भाजपचे सरकार आज मुख्यमंत्री, मंत्री, आमदार व पक्षाचे पदाधिकारी यांच्या मधिल मतभेद मिटवण्यातच व्यस्त आहे, अशी टीका बिना नाईक यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरिल आदेशाने तयार केलेला सावळा गोंधळ बंद करण्यासाठी त्वरित स्पष्टीकरण देणे गरजेजे आहे. आज शिक्षक, कर्मचारी व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. असेही त्या म्हणाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.