ETV Bharat / bharat

Goa Election 2022 : पणजीत उत्पल पर्रीकरांमुळे भाजपाची प्रतिष्ठा लागली पणाला..

गोवा विधानसभा निवडणुकीत ( Goa Assembly Election 2022 ) मतमोजणीसाठी अवघे काही तास बाकी आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आहे ती गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर ( Ex CM Manohar Parrikar ) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर ( Utpal Parrikar ) यांची. भाजपने तिकीट नाकारल्याने अपक्ष रिंगणात उतरलेल्या उत्पल यांच्यामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अपक्ष नशीब आजमावत असलेल्या उत्पल यांनी भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. तर जाणून घेऊयात उत्पल पर्रीकर यांच्याविषयी..

उत्पल पर्रीकर
उत्पल पर्रीकर
author img

By

Published : Mar 8, 2022, 4:19 PM IST

पणजी : स्व. मनोहर पर्रीकर हे माजी केंद्रीय मंत्री आणि तब्बल चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री ( Ex CM Manohar Parrikar ) राहिलेले आहेत. २०१९ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर ( Utpal Parrikar ) यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारले. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. 1994 पासून ते 2019 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत मनोहर पर्रिकर यांनी पणजी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, तेथेच उत्पल यांनी विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) लढवली आहे. त्यामुळे भाजपनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

ब्राह्मण, ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा मिळणार का?

या निवडणुकीत त्यांनी मनोहर पर्रीकरांचा राजकीय वारस म्हणून जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न केला. अपक्ष निवडणूक लढवत असल्याने त्यांना “माईक” हे मतदान चिन्ह मिळाले होते. या निवडणुकीत त्यांना त्यांच्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळू शकतो. पाच वेळा पणजीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनोहर पर्रिकर यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. याशिवाय अनेक ख्रिश्चन उच्चभ्रू देखील उत्पल यांच्या बाजूने उभे राहिले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्पल पर्रीकर
उत्पल पर्रीकर

भाजपची प्रतिष्ठा पणाला

देशाचे लक्ष असलेल्या पणजी विधानसभा निवडणुकीत उत्पल यांच्या उमेदवारीमुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या वतीने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे, नाराज उत्पल पर्रीकर यांनी त्यांच्या विरोधात जोरदार लढत दिली आहे. शिवसेनेही उत्पल यांच्या विरोधात उमेदवार न देता त्यांना पाठिंबा दिला आहे. या शिवाय अनेक संघटनांनी उत्पलला उघड आणि छुपा पाठिंबा दिल्यामुळे या निवडीवर सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.

फडणवीस म्हणाले होते, कर्तृत्व मोठे नसल्याने तिकीट नाकारले

उत्पल यांना भाजपने डावलून बाबुश मोंसरात याना तिकीट दिले. मात्र, राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले होते की, उत्पल पर्रीकर यांना तिकीट देण्यासाठी त्यांचे कर्तृत्व मोठे नाही, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिले नाही. इथूनच उत्पल पर्रीकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि फडणवीस यांच्यावर पर्रीकर यांनी जोरदार टीका केली. त्यामुळेच, पणजीची उमेदवारी देण्यात आलेल्या बाबुश मोंसरात यांना विजयी करण्याचे सर्वात मोठे आव्हान भाजपा आणि पर्यायाने फडणवीस यांच्या समोर उभे टाकले होते.

मनोहर पर्रिकरांचा उत्पल सांभाळणार वारसा

अनेक वर्षांपासून मनोहर पर्रीकर हे राजधानी पणजी मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. आमदार, विरोधी पक्षनेते ते राज्यात भाजपाचे पाहिले मुख्यमंत्री असा त्यांचा याच मतदारसंघातून प्रवास झाला. याच मतदारसंघात त्यांना मानणारा आणि अर्थातच त्यांना मनोहर भाई ही उपाधीही देणारा मतदारवर्ग आहे. मनोहर पर्रिकरांमुळेच वर्षानुवर्षे हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे.

अमेरिकेत घेतले आहे शिक्षण

उत्पल पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत. मनोहर पर्रीकर यांना दोन मुले आहेत. उत्पल आणि अभिजीत. उत्पल हे अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे पदवीधर ( Utpal Parrikar Education ) आहेत. उत्पल यांच्या पत्नीचे नाव उमा सरदेसाई आहे. उमा यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांना ध्रुव नावाचा मुलगा ( Utpal Parrikar Family ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.