ETV Bharat / bharat

Goa Election 2022 : अटानासिओ मोन्सेरात पणजीतून भाजपची प्रतिष्ठा राखणार का?

गोवा विधानसभा निवडणुकीचा ( Goa Assembly Election 2022 ) निकाल उद्या लागणार आहे. या निवडणुकीत प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणजे पणजी. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा ( Ex CM Manohar Parrikar ) हा मतदारसंघ आहे. पर्रीकर यांचे पुत्र उत्पल ( Utpal Manohar Parrikar ) यांना डावलत भाजपने या मतदारसंघात बाबुश उर्फ अटानासिओ मोन्सेरात ( Atanasio Monserrate ) यांना उमेदवारी दिली आहे. गंभीर गुन्ह्यात त्यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांना कलंकीत उमेदवार म्हणले जाते. उत्पल पर्रिकर यांनी त्यांना अपक्ष उभे राहत आव्हान दिले आहे. त्यामुळे मोन्सेरात हे पणजी मतदारसंघातून भाजपची प्रतिष्ठा राखणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. चला तर मग पाहूयात कोण आहेत बाबुश मोन्सेरात..

अटानासिओ मोन्सेरात
अटानासिओ मोन्सेरात
author img

By

Published : Mar 9, 2022, 3:53 PM IST

पणजी : बाबूश या नावाने परिचित असलेले अटानासिओ मोन्सेरात ( Atanasio Monserrate ) हे गोव्यातील एक मुरब्बी राजकारणी आहेत. गोवा विधानसभेत ते सलग तीन टर्म निवडून आले आहेत. सध्या ते पणजीतून गोवा विधानसभेचे सदस्य आहेत. तत्पूर्वी ते तळेगावचे आमदार होते. तळेगावच्या आमदार जेनिफर यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. उल्लेखनीय म्हणजे, जुलै 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या दहा सदस्यांपैकी ते एक होते. यंदा ते भाजपतर्फे नशीब आजमावत ( Goa Assembly Election 2022 ) आहेत.

अटानासिओ मोन्सेरात
अटानासिओ मोन्सेरात

२००२ मध्ये पहिल्यांदा आले निवडून

मोन्सेरात यांनी 2002 मध्ये पहिली निवडणूक युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या तिकिटावर तळेगाव मतदारसंघातून लढवली. त्यांचे विरोधक सोमनाथ दत्ता जुवारकर हे काँग्रेसचे दोनवेळा विधानसभेचे सदस्य होते. मोन्सेररेट यांनी झुवारकर यांचा सुमारे दोन हजार मतांनी पराभव केला आणि ते पहिल्यांदाच गोवा विधानसभेवर निवडून आले होते.

भाजप सरकरचा केला होता पाडाव

स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते नगर आणि नियोजन मंत्री झाले. 2005 मध्ये, त्यांच्यासह इतर दोन मंत्र्यांनी मनोहर पर्रीकर ( Ex CM Manohar Parrikar ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यावेळेसच्या भाजप सरकार अल्पमतात आले. अल्पमतात आल्याने गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार त्यांनी पाडले होते.

कोण आहेत अटानासिओ मोन्सेरात..
कोण आहेत अटानासिओ मोन्सेरात..

काँग्रेस सरकारमध्येही होते मंत्री

नंतरच्या पोटनिवडणुकीत, त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाच्या सिल्वेरा एग्नेलो मारियानो यांचा सुमारे 4000 मतांनी पराभव केला. मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आले. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत, ते भारतीय जनता पक्षाच्या सिल्वेरा एग्नेलो मारियन यांच्याविरुद्ध लढले होते.

कोण आहेत अटानासिओ मोन्सेरात..
कोण आहेत अटानासिओ मोन्सेरात..

पती - पत्नी दोघेही एकाच वेळेस आले होते निवडून

मोन्सेरात यांनी ती निवडणूक सुमारे 2000 मतांनी जिंकली आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त केले गेले. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांची तळेगावची सुरक्षित जागा त्यांच्या पत्नी जेनिफर यांच्यासाठी सोडली आणि सांताक्रूझ मतदारसंघातून निवडणूक लढवली. मोन्सेररेट यांनी काँग्रेसच्या तिकिटावर रॉडॉल्फो लुई फर्नांडिस यांचा सुमारे 2300 मतांनी पराभव करत ती निवडणूक जिंकली. त्याच निवडणुकीत मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर यांनीही तळेगाव मतदारसंघातून निवडणूक जिंकली. गोवा विधानसभेवर पती आणि पत्नी एकाचवेळी निवडून येण्याचा इतिहास त्यांनी घडवला. 2015 मध्ये मोन्सेरात यांना "पक्षविरोधी कारवायांसाठी" सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले होते.

बलात्काराच्या आरोपात होते अटकेत

मोन्सेरात यांनी पणजीमधून 2017 ची निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाच्या सिद्धार्थ श्रीपाद कुंकालीएंकर यांच्याकडून सुमारे 1000 मतांनी पराभूत झाले. जुलै 2017 मध्ये ते गोवा फॉरवर्ड पार्टीमध्ये सामील झाले. मे 2016 मध्ये गोवा पोलिसांनी 16 वर्षांच्या मुलीला विकत घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मोन्सेरात यांना अटक केली होती. आता ते प्रतिष्ठेच्या पणजी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.