ETV Bharat / bharat

Subhash Faldesai Resign : गोवा विधानसभेचे उपसभापती सुभाष फळदेसाई यांचा राजीनामा - सुभाष फळदेसाई यांचा राजीनामा

मंत्रिपदाची शपथ घेतलेले गोवा विधानसभेचे उपसभापती आमदार सुभाष फळदेसाई ( Subhash Faldesai Resign ) यांनी त्यांच्या उपसभापतिपदाचा राजीनामा दिला ( Goa Assembly Deputy Speaker ) आहे. आज सकाळी त्यांनी हा राजीनामा दिला. गोव्याचा मंत्रिमंडळात फळदेसाई यांना संधी मिळाली आहे.

सुभाष फळदेसाई यांचा राजीनामा
सुभाष फळदेसाई यांचा राजीनामा
author img

By

Published : Apr 9, 2022, 5:38 PM IST

पणजी ( गोवा ) : गोवा विधानसभेचे उपसभापती ( Goa Assembly Deputy Speaker ) व सांगे मतदारसंघाचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी आज सकाळी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिला ( Subhash Faldesai Resign ) आहे. विधानसभा सचिवांकडे त्यांनी आपला राजीनामा आज सकाळी सुपूर्त केला. फळदेसाई हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार असून, आगामी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला जाणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर भाजपने मार्च महिन्याच्या अखेरीस आपल्या कॅबिनेटचा विस्तार केला होता. दरम्यान, यावेळी भाजपच्या आठ मंत्र्याने शपथ घेतली होती. उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी (दि. 9 एप्रिल) सकाळी राजभवन येथील राज दरबार हॉलमध्ये संपन्न झाला. मात्र, अपक्ष आमदारांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आल्याने त्यांचा हिरमोड झाला.

मंत्रिमंडळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांना स्थान देण्यात आला आहे. ढवळीकर यांच्यासोबत भाजपचे नीळकंठ हळर्णकर आणि सुभाष फळदेसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, सुभाष फळदेसाई तसेच नीळकंठ हळर्णकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपला पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांचा मंत्री होण्याचे स्वप्न तूर्तास तरी भंगल्याचा दिसून येते. भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष आमदारांचा पुरता भ्रमनिरास झालेला आहे. या तीनही अपक्ष आमदारांना भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.