पणजी: गोव्यातील सीशेल क्राफ्ट ही या नाजूक कलांपैकी एक आहे जी समुद्राला आपल्या भूमीशी जोडते असे सागितले जाते. गोव्याचे सीशेल क्राफ्ट (Seashell Craft in Goa) पोर्तुगीजांच्या काळापासून आहे. या कला प्रकारात सागरी प्राण्यांनी टाकलेल्या शिंपल्यांचा वापर केला जातो. त्यातून विविध कलाकृती आणि लक्षवेधी वस्तू तयार केल्या जातात. या हस्तकलेच्या माध्यमातून निसर्गाला मानवजातीला आणि समुद्राला जमिनीशी जोडण्याचे काम केले जाते अशी मान्यता आहे.
जैविक प्रक्रियेचा भाग म्हणून सागरी प्राण्यांद्वारे शंख शिंपले बाहेर टाकले जातात. ते नंतर किनाऱ्यावरून गोळा केले जातात आणि त्यांना आकर्षक कलेमध्ये विकसीत केले जातात. सीशेल हस्तकला अनेक दशकांपासून सुरु आहे. काही कुशल कारागीर गोव्याचे मूळ रहिवासी आहेत आणि तिथल्या संस्कृतीचे ते रक्षण करत आले आहेत. पिढ्यानपिढ्या ते सीशेल क्राफ्ट करत आहेत सोबतच हा वारसा ते पुढच्या पिढी पर्यंत पोचवत आहेत. त्यांचा वारसा अनेक कला संग्रहालयांनी पण जतन केला आहे.
सीशेल कलाकारांसोबत त्यांचा इतिहास आणि कलाकुसर दाखवण्यासाठी राज्यभर प्रदर्शने, कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात. सीशेल हा सागरी प्राण्यांचा बाह्य संरक्षणात्मक थर आहे. तो त्यांचे समुद्रातील भक्षकांपासून संरक्षण करतो. हे स्तर अनेकदा या प्राण्यांद्वारे बाहेर टाकले जातात आणि ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत वाहत येतात. ते कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात आणि सर्व हवामानात टिकून राहतात. समुद्रकिना-यावर अनेक आकार आणि प्रकारचे शेल आढळतात. ते केवळ सजावट आणि कलापुरते मर्यादित नाहीत. तर जायंट क्लॅम, ऑयस्टर आणि ग्रीन मसल सारख्या काही कवचांचा वापर खाद्यतेसाठी केला जातो. खाण्यायोग्य चुना स्कॅलॉप्स, कॉकल्स आणि क्लॅम्स सारखे प्रकार तयार करण्यासाठीही या सीशेलचा वापर केला जातो. हस्तकला कलाकार ते शेल म्हणजे शिंपले गोळा करतात आणि नंतर त्यांचे मोहक कलाकृतीमध्ये रूपांतरित करतात त्यालाच सीशेल क्राफ्ट म्हणून ओळखले जाते. यातूनच मग दागिने तसेच इतर विविध हस्तकला तयार केल्या जातात.
शंख शिल्प या प्रकारची हस्तकला शंखाच्या गोगलगायीपासून बनलेली असते. याला अध्यात्मिक महत्त्व देखील आहे. कारण दक्षिण आशियाई संस्कृतीत शंख फुंकने म्हणजे वाईट गोष्टी नाहीसे करने असे मानले जाते. गोव्यात शंख दागिने खूप लोकप्रिय आहेत. गोव्यातील पुरातत्वशास्त्रज्ञांना अनेक वास्तुशिल्पाचे पुरावे सापडल्याने ही कला प्राचिन असल्याचे स्पष्ट झाले आहे. शंखशिल्पांच्या मदतीने अनेक इमारती आणि कमानीही सजवण्यात आल्या होत्या. त्याच्या समकालीन वापराव्यतिरिक्त, सीशेल क्राफ्टचा उपयोग संगीत वाद्ये, सजावटीच्या वस्तू, आतील कलाकृती इत्यादी करण्यासाठी केला गेल्याचे पहायला मिळालेले आहे.
हेही वाचा : Kunbi Saree in Goa : मॉर्डन गोव्याचा पारंपरिक लूक म्हणून प्रसिद्ध आहे कुणबी साडी