आज दिवाळी (Diwali) म्हणजेच प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. आनंदाचा, मांगल्याचा आणि प्रकाशोत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी सणात एकमेकांना मिठाई देताना हा आनंद संस्मरणीय करण्यासाठी भेटवस्तु देखील देतात. दिवाळीत लक्ष्मी, गणेशाची पूजा (Lakshmi Ganesha Puja) सुख समृद्धी आणि आनंदी जीवनासाठी केली जाते. दिवाळीचा सणामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळी भेटवस्तूंची खरेदी वाढत आहे. दिवाळीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. दिवाळीनिमित्त भेट (Gifts) म्हणून काही गोष्टी देणे अशुभ ठरू शकते. गिफ्ट देताना कोणत्या वस्तु द्याव्यात आणि कोणत्या वस्तु न द्यावात याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
शास्त्रात सांगण्यात आले आहे की, दीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मीचे चित्र असलेले चांदीचे नाणे देऊ नये. व्यक्तीवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. या नाण्याचा घेणारा आणि देणारा दोघांवरही अशुभ प्रभाव पडतो असे मानले जाते.
दिवाळीत कोणालाही रुमाल किंवा अत्तर भेट देऊ नये, असे ज्योतिष अभ्यासकांचे मत आहे. असे केल्याने शुक्र ग्रह देणाऱ्याच्या कुंडलीत कमजोर स्थितीत बसतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले आहे की परफ्यूम हा शुक्राचा कारक आहे. त्यामुळे परफ्यूम दिल्याने व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देऊ शकते.
ज्योतिष शास्त्रानुसार, अनेक लोक दिवाळीच्या गिफ्टमध्ये ताजमहलचा आकार देतात पण ताजमहलाचा आकार गिफ्ट म्हणून देणे शुभ मानले जात नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार काच फोडणे अशुभ मानले जाते. काचेची बनलेली वस्तू कोणालाही भेट देऊ नका. कारण ते तुटण्याची भीती नेहमीच असते. यामुळे देणारा आणि घेणारा दोघेही अडचणीत येऊ शकतात.
दिवाळीत लोखंडी भांडीही भेट दिली जात नाहीत. लोहाचा संबंध राहुशी असून राहु हा अशुभ ग्रह मानला जातो. राहूच्या अशुभ प्रभावामुळे तुम्ही गरीब व्हाल आणि तुमच्याकडे पैशांची कमतरता भासते.
आपण एखादा व्यवसाय करत असल्यास दिवाळीला आपल्या व्यवसायाशी संबंधी वस्तू भेट म्हणून देऊ नका. कपड्यांचा किंवा भांड्यांचा व्यवसाय असल्यास कुणालाही स्वत:च्या व्यवसायातील वस्तू भेट म्हणून देऊ नका.