ETV Bharat / bharat

UPSCची तयारी करणाऱ्या तरूणीची आत्महत्या; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - UPSC करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य दिल्लीतील राजेंद्र नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. 'युपीएससी'ची पूर्व परीक्षा रविवारी होणार आहे. त्यापूर्वीच विद्यार्थीनीने हे टोकाचे पाऊल उचलले समोर आले आहे. विद्यार्थीनीने हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप कळू शकले नाही आहे.

Girl commits suicide while preparing for UPSC in Delhi
UPSCची तयारी करणाऱ्या तरूणीची आत्महत्या; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
author img

By

Published : Oct 9, 2021, 8:09 PM IST

Updated : Oct 9, 2021, 8:28 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य दिल्लीतील राजेंद्र नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. 'युपीएससी'ची पूर्व परीक्षा रविवारी होणार आहे. त्यापूर्वीच विद्यार्थीनीने हे टोकाचे पाऊल उचलले समोर आले आहे. विद्यार्थीनीने हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप कळू शकले नाही आहे. आकांक्षा मिश्रा असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

दिल्ली करत होती स्पर्धा परीक्षाची तयारी -

मुळची उत्तर प्रदेशातील भादोही येथील रहिवासी असलेली आकांक्षा मिश्रा ही स्पर्धा परीक्षा करण्यासाठी दिल्लीमध्ये राहायला गेली होती. जुन्या राजेंद्रनगर भागातील भाड्याच्या घरात ती 2 ऑक्टोबर पासून राहत होती.

घरात पंख्याला लटकलेल्या स्थिती आढळला मृतदेह -

सकाळी 11 वाजता तिच्यासोबत राहणाऱ्या मुलींनी तीला पाहिले होते. मात्र त्यानंतर 11 वाजून 50 मिनिटांनी आकांक्षाने घरातील पंख्याला गळफास घेलल्याचे उघड झाले, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घराचा दरवाजा हा आतून बंद केलेला होता. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही अशी माहिती पोलीस आयुक्त श्वेता चौहान यांनी माध्यमांना दिली आहे. तसेच या मुलीच्या पालकांना याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली असून पुढील तपास हे पोलीस करत आहेत असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - बस - ट्रेनमधील बलात्काराच्या 'या' घटनांनी हादरले होता महाराष्ट्र, वाचा सविस्तर...

Last Updated : Oct 9, 2021, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.