मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नवी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. काल शुक्रवार दि. 26 ऑगस्ट रोजी त्यांनी पाच पानांचे पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर देशभरात काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान ईटीव्ही भारतने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचित केली आहे. Interview By Prithviraj Chavan On Etv Bharat त्यामध्ये हा काँग्रेसच्या कच खाऊ धोरणांचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. गुलाम नबी आझाद यांचा सर्व पदांचा राजीनामा देणे तसचे पक्षातून जाणे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
कोणीही बाहेर जावे, अशी पक्षाची परिस्थिती नाही काँग्रेस पक्षाला वारंवार अनेक निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या काही काळात पंजाब, केरळ, गोवा या महत्त्वाच्या राज्यांमध्ये पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पक्षाचा सातत्याने पराभव होतो आहे. त्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे सूचित केले होते. Prithviraj Chavan On Etv Bharat 23 महत्त्वाच्या व्यक्तींनी यात सह्या केल्या होत्या. त्यात गुलाम-नबी आझाद यांच्यासह आपणही सही करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, कोरोना आणि अन्य काही कारणांमुळे त्यावर फारसे पक्षाने लक्ष दिले नाही. राहुल गांधी जर नेतृत्वाचा निर्णय घेत नसतील तर आपण लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्या असे सांगूनही पक्षात फारसा बदल झाला नाही. त्याचाच हा परिणाम आहे अशी परखड प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
24 वर्षांत निवडणुका नाही, होयबांचा पक्ष पक्षांमध्ये गेल्या 24 वर्षांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे निवडणूक समिती असेल, संसदीय समिती असेल अथवा अन्य समित्या असतील त्यावर केवळ नियुक्त करण्यात आल्या आहेत. नियुक्त केलेल्या व्यक्ती आपली मते ठामपणे मांडू शकत नाहीत. Ghulam Nabi Azad resignation त्यामुळे पक्ष केवळ होयबांचा झाला आहे, हे चित्र बदलायचे असेल तर निवडणुका घेतल्या पाहिजे आणि सर्व स्तरावर बदल केला पाहिजे अशी आम्ही सातत्याने मागणी केली आहे. असेही चव्हाण म्हणाले आहेत.
संभाजी ब्रिगेडशी युती हा शिवसेनेचा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यात संभाजी ब्रिगेड यांच्यासोबत युती करत असल्याबाबत घोषणा केली. महाविकास आघाडीत असताना संभाजी ब्रिगेड सारख्या पक्षाशी युती करणे योग्य आहे का? असे विचारतात चव्हाण म्हणाले की कोणाशी युती करायची हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी काय युती केली आणि काय निर्णय घेणार आहे हे त्यांनीच ठरवावे. मात्र, या संदर्भात महाविकास आघाडी म्हणून चर्चा केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य निवडणुका बाबत निर्णय आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांबाबत महाविकास आघाडीने अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय घेतलेला नाही. मात्र, लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढायचे की स्थानिक पातळीवर काही वेगळी समीकरणे जुळतात याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. लवकरच ते चित्र स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.
विरोधकांनी एकत्र यावे देशामध्ये नरेंद्र मोदी यांना मोठा विरोध आहे. त्यांच्या विरोधातील मतांचे विभाजन जर आपल्याला टाळता आले, तर नरेंद्र मोदी यांचा पराभव शक्य आहे. आणि ते काँग्रेस करू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने सर्व विरोधकांना एकत्र करून जर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ठामपणे आघाडी उभी करण्यात यश मिळवले, तर नरेंद्र मोदी यांचा पराभव होऊ शकतो आणि त्या दृष्टीने विचार सुरू असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - New CJI takes oaths न्यायमूर्ती यू यू ललित यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ