ETV Bharat / bharat

Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझादांनी नवा पक्ष काढणार असल्याची केली घोषणा

गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी पक्षाचे नाव जाहीर केले नाही. काही दिवसांपूर्वी आझाद हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. ( Ghulam Nabi Azad a new party ) त्यावेळी त्यांनी पाच पानी पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत बाबींसह राहुल गांधी यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, आझाद यांनी आजही त्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्हाला 'हॅपी ट्विट' आणि मला 'हॅपी हार्ड वर्क' हवे आहे.

गुलाम नबी आझाद
गुलाम नबी आझाद
author img

By

Published : Sep 4, 2022, 3:42 PM IST

जम्मू - जम्मू काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांचे आज रविवार (दि. 4 सप्टेंबर)रोजी भव्य स्वागत करण्यात आले. तसेच, त्यांच्या समर्थनार्थ रॅली देखील काढण्यात आली. काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांची सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. ( Gulam Nabi Azad will form a new party ) यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली.

ट्विट
ट्विट

पक्षासाठी 50 वर्ष काम केल - मी काँग्रेस पक्षासाठी 50 वर्ष काम केले आहे. या काळात मला जनतेने खूप प्रेम दिले असल्याचे आझाद या दरम्यान म्हणाले. ( Ghulam Nabi Azad new party announcement ) आज मी काहीही नाही, तरीही मला राज्यातील जनतेचे खूप प्रेम मिळत आहे. माझ्यामुळे अनेक जणांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. मला इतके प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचही आझाद यावेळी म्हणाले आहेत.

ट्विट
ट्विट

फक्त ट्विटर आणि संगणकावर असल्याचा टोला - आम्ही आमच्या रक्त आणि घामाने काँग्रेस पुढे गेली. काँग्रेस ही संगणकाने नाही, ट्विटरने नाही, संदेशांने नाही तर आमच्या घामाने पुढे गेलेली पार्टी आहे. आमची बदनामी करणार्‍यांचीच पोहोच ही फक्त ट्विटर आणि संगणकावर असल्याचा टोला देखील आझाद यांनी यावेळी लगावला. दरम्यान, 26 ऑगस्टला गुलाम नबी आझाद यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आझाद हे नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसमधून बाहेर - दिग्गज राजकीय नेते, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आझाद राहूल गांधींच्या Rahul Gandhi कार्यपध्दतीवर नाराज होते. आता ते नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. तसेच गुलाम नबी आझाद कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाहीत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या राजकारण्यांशी चर्चा सुरू असून लवकरच तुम्हाला आणखी राजीनामे दिसतील, अशी माहिती निकटवर्तीयांनी ईटीव्ही भारतला दिलीे. त्यांच्या एका अत्यंत निकटच्या मित्राकडून या संदर्भात माहिती मिळाली आहे.

राहूल गांधींवर नाराज - शुक्रवारी, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. दरम्यान,त्यांनी एक पत्र लिहून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. राहूल गांधींचे निर्णय पोरखेळ होते. त्यांच्यामुळेच काँग्रेसचा दोन लोकसभा निवडणूकांत पराभव झाला, असं आझाद आपल्या पत्रात म्हणाले आहेत. (Ghulam Nabi Azad To Form New Party After Resigning From Congress )

हेही वाचा - रोहिंग्या हे बांगलादेशवर 'मोठे ओझे'; समस्येवरील समाधानात भारताची मोठी भूमिका, शेख हसीना यांचे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.