ETV Bharat / bharat

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचे मतदान पार पडले, चार डिसेंबरला निकाल

ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (जीएचएमसी)च्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या १५० प्रभागांमध्ये १,१२२ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

file pic
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Dec 1, 2020, 7:58 PM IST

Updated : Dec 1, 2020, 8:53 PM IST

हैदराबाद - ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (जीएचएमसी)च्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या १५० प्रभागांमध्ये १,१२२ उमेदवार रिंगणात उभे आहेत. ७४ लाखांहून अधिक मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. ४ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

36.76 टक्के मतदान

कोरोना संसर्गाची भीती असल्याने नागरिकांनी मतदानाला येण्याचे टाळल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीला फक्त ३६.७६ टक्के मतदान झाले. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केल्याने मोठ्या संख्येने मतदान बाहेर पडतील अशी शक्यता होती. मात्र, नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. मागील निवडणुकीत सुमारे ४५ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळी फक्त ३६.७६ टक्के मतदान झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत निवडणूक पार पडली. सध्या महापालिकेवर तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता आहे. ती कायम ठेवण्याचा प्रयत्न टीआरएस करत आहे. या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. टीआरएस, काँग्रेस आणि भाजपा सर्व जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर, एमआयएम हे केवळ ५१ जागांवर निवडणूक लढवत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये टीआरएसला ९९, तर एमआयएमला ४४ जागा मिळाल्या होत्या. भाजपाला त्यावर्षी केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले होते.

भाजपने महापालिका निवडणूक केली प्रतिष्ठेची..

डुब्बक विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये बाजी मारलेल्या भाजपला आता महापालिका जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे आपली सर्व शक्ती पणाला लावत भाजप ही निवडणूक लढवली. या निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही हैदराबादमध्ये आले होते.

Last Updated : Dec 1, 2020, 8:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.