ETV Bharat / bharat

Yogi Adityanath France Riots : 'योगींना फ्रान्समध्ये पाठवा, ते 24 तासांत..' ; फ्रान्समधील दंगलींवर जर्मन प्राध्यापकाचे ट्विट व्हायरल - एन जॉन योगी आदित्यनाथ

प्रसिद्ध जर्मन प्राध्यापक एन. जॉन यांनी फ्रान्समधील दंगली थांबवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवावे, असे ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटला योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने उत्तर दिले आहे.

Yogi Adityanath France Riots
योगी आदित्यनाथ फ्रान्स दंगल
author img

By

Published : Jul 1, 2023, 5:34 PM IST

लखनौ : जगप्रसिद्ध डॉक्टर आणि प्रोफेसर एन. जॉन कॅम यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दंगल रोखण्याच्या मॉडेलचे कौतुक केले आहे. तसेच फ्रान्समधील दंगल थांबवण्यासाठी योगी यांच्या मॉडेलचा अवलंब करायला हवा, असे ट्विट देखील त्यांनी केले आहे. योगी आदित्यनाथ यांना भारतातून फ्रान्सला पाठवावे, जेणेकरून ते 24 तासांत येथील दंगल थांबवू शकतील, असे ट्विट त्यांनी केले आहे. याला उत्तर देत योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, 'आज संपूर्ण जग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मॉडेलचे कौतुक करत आहे'.

  • Whenever extremism fuels riots, chaos engulfs and law & order situation arises in any part of the globe, the World seeks solace and yearns for the transformative "Yogi Model" of Law & Order established by Maharaj Ji in Uttar Pradesh. https://t.co/xyFxd1YBpi

    — Yogi Adityanath Office (@myogioffice) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

योगींच्या बुलडोझर मॉडेलची चर्चा : जर्मन प्राध्यापक एन. जॉनचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगल रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. विशेषत: दंगलखोरांकडून वसुली करणे आणि बुलडोझर मॉडेलची चर्चा सुरू आहे. प्राध्यापक एन. जॉनच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून अधिकृत ट्विट करण्यात आले आहे. ट्विट मध्ये म्हटले आहे की, 'जेव्हा जेव्हा अतिरेकी जगाच्या कोणत्याही भागात दंगली, अराजकता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करतात तेव्हा जगात शांतता आणि परिवर्तनाची मागणी होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे योगी मॉडेल तयार केले आहे'.

'योगी दंगलखोरांशी कठोरपणे वागतात' : युरोपातील प्रसिद्ध डॉक्टर व प्रोफेसर एन. जॉन कॅमच्या फ्रान्समधील दंगलीचा सामना करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना पाठवण्याच्या मागणीवर भाजपचे प्रवक्ते हिरो बाजपेयी म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ही खास गोष्ट आहे. ते दंगलखोरांशी कठोरपणे वागतात. दंगलखोरांकडून वसुली केली जाते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घरांवर बुलडोझर चालवतात. संपूर्ण जग हे सत्य स्वीकारत आहे. प्रोफेसर जॉन यांनाही योगींची स्टाईल आवडली आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फ्रान्समध्ये येण्याची विनंती केली आहे.

हे ही वाचा:

  1. UP Encounters : योगी आदित्यनाथ सरकारच्या कारकिर्दीत सर्वाधिक एनकाउंटर, चकमकीत १७८ जण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.