अमृतसर: लुधियाना जिल्ह्यातील ग्यासपुरा भागात आज सकाळी वेरका बूथजवळ गॅस गळती झाली आहे. या गॅस गळतीत किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांच्याकडून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. कोणत्या गॅसमधून गळती झाली याचा पोलीस तपास सुरू आहे. अद्याप गॅस गळतीचे कारण समोर आले नाही. प्रशासनाकडून संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे. या अपघातानंतर काही लोक बेशुद्ध झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.
घटनेनंतर परिसर सील- लुधियानाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गॅस गळतीच्या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. कोणालाही घटनास्थळी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. परिसरापासून लोकांनाही अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे. या परिसराची नाकेबंदी करण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. गोयल मिल्क प्लांट नावाच्या या कारखान्यात मोठ्या कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थ येतात. या कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे.
परिसरात नाकाबंदी- ही घटना घडलेल्या ग्यासपुरा परिसराला प्रशासनाने रिकामे केली आहे. ही दुर्घटना म्हणजे प्रशासनासाठी अग्नीपरीक्षा ठरत आहे. एका नागिराकाने सांगितले, की ही या दुर्घटनेत माझ्या कुटुंबातील पाच सदस्य बेशुद्ध असल्याची मला माहिती देण्यात आली आहे. गॅस गळतीवर नियंत्रण मिळविणे कठीण असते. हे लक्षात घेऊन एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफचे जवान लुधियानाच्या ग्यासपुरा भागात घटनास्थळी पोहोचले आहेत. गॅस गळतीमुळे त्रासाला सामोरे जावे लागणारे 11 जण रूग्णालयात दाखल आहेत. स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचल्याने मदतकार्याला सुरुवात झाली आहे. लुधियाना पश्चिमच्या एसडीएम स्वाती म्हणाल्या, की ही गॅस गळती दुर्घटना आहे, हे खात्रीने सांगता येईल. लोकांना वाचविण्यासाठी एनडीआरएफ घटनास्थळी कार्यरत आहे.
घटना कशामुळे घडली?घटना घडल्याची माहिती मिळताच कारखान्याच्या शेजारी राहणार्या लोकांचे कुटुंबीय आले आहे. मात्र, त्यांचे कुटुंबीयही बेशुद्ध पडले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी मदतकार्य करत आहे. घटनास्थळी स्थानिक आमदारही पोहोचले आहेत. या कारखान्यात काय बनवले जात होते? गॅस गळती कशी झाली? याचाही तपास सुरू आहे. रविवारी रात्री मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू होता. त्यामुळे गॅस गळती झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारखान्यातील पाईप फुटल्याने गळती झाली असावी, अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र कारखान्यात असा कोणता निष्काळजीपणा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसून तपास करण्यात येत आहे.