ETV Bharat / bharat

‘कोव्हिशिल्ड’च्या 2 डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढवलं - कोव्हॅक्सिन लसीकरण

देशात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. एका व्यक्तीला कोरोना लसीचे दोन डोस देण्यात येतात. कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. हा कालावधी 12 ते 16 आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. सरकारच्या राष्ट्रीय लस सल्लागार समितीने दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा सिफारीश केली होती.

कोरोना लस
कोरोना लस
author img

By

Published : May 13, 2021, 8:09 PM IST

नवी दिल्ली - देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. देशात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. एका व्यक्तीला कोरोना लसीचे दोन डोस देण्यात येतात. कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. हा कालावधी 12 ते 16 आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. सरकारच्या राष्ट्रीय लस सल्लागार समितीने दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा सिफारीश केली होती.

कोव्हिशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे. मात्र, ​कोव्हॅक्सिन लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्यात आलेले नाही. सध्या कोव्हिशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर चार ते आठ आठवडे असे आहे. ही शिफारस अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा अनेक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

देशात लसीची कमतरता -

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात ऑक्सफर्ड-अ‌ॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीचे लसीकरण सुरू आहे. देशातील लसींची कमतरता आणि वाढती मागणी यात दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह अनेक राज्यांनी लस पुरवठ्यासाठी जागतिक निविदा मागविण्याचे ठरविले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी लस घेण्यासाठी सहा महिने वाट पाहावी. तसेच बाळांना स्तनपान करणाऱ्या महिला लस घेऊ शकतात, असे एनजीटीआयने म्हटले आहे.

हेही वाचा - स्मशनात जागा नाही! ख्रीस्ती धर्मीय रुग्णांच्या मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.